उन्हाळी सुटीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी वातानुकूलित डबलडेकर गाडी अजिबातच चालणार नसली, तरी त्याची भरपाई मध्य रेल्वेने तात्काळ विशेष गाडी चालवून केली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही तात्काळ विशेष गाडी कोकणासाठी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या दरम्यान मध्य रेल्वे ९, १०, १६, १७ मे या दिवशी दोन तात्काळ विशेष गाडय़ांच्या आठ फेऱ्या चालवणार आहे. या गाडय़ांची आरक्षणे आज, ८ मे रोजी खुली होतील. ही तात्काळच्या तिकिटांच्या दरांत खरेदी करावी लागतील.
०१००५ डाऊन तात्काळ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून ९ मे व १६ मे रोजी रात्री ००.४५ मिनिटांनी रवाना होईल. ही गाडी मडगावला त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल, तर ०१००६ अप ही तात्काळ विशेष गाडी ९ व १६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता मडगावहून निघून त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. तर, ०१०४५ डाऊन तात्काळ विशेष गाडी १० व १७ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ०१.१० मिनिटांनी निघून त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता मडगावला पोहोचेल. ०१०४६ अप ही गाडी १० व १७ मे रोजी दुपारी ४.०० वाजता मडगावहून निघून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ३.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा