कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर व्हिलेज येथे शाळेच्या मुलांची ने-आण करणाऱ्या बसला गुरुवारी दुपारी आग लागली. शाळेच्या मुलांना त्यांच्या घरी सोडून ही रिकामी बस पुन्हा शाळेकडे परतत असताना हा प्रकार घडला. सुदैवाने बस रिकामी असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.  ठाकूर पब्लिक स्कूलची ही बस होती. बसला आग लागल्याचे कळताच प्रसंगावधान राखून गाडीचा चालक आणि क्लिनर यांनी बाहेर उडी टाकली. त्यामुळे या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाली नाही.
गाडीचा चालक मोर्य यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिसांचे फिरते वाहन आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. समतानगर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Story img Loader