राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय.
नक्की वाचा >> Nawab Malik Arrest : “मला अटक झालीय, पण…”; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया
प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली.
नक्की वाचा >> नवाब मलिक ईडी चौकशी : २०२४ चा इशारा देणाऱ्या राऊतांना नितेश राणेंचा टोला; म्हणाले, “यापुढे तुम्ही आपली…”
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.