मुंबईः टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या आधारावर ईडीही याप्रकरणात तपास करीत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला ईडीतील वरिष्ठ सूत्रांनी दुजोरा दिला. याप्रकरणातील युक्रेनमधील मुख्य आरोपीने गेल्या तीन महिन्यांमध्ये २०० कोटी रुपये कूट चलनाद्वारे परदेशात पाठवल्याचा संशय आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदारांची माहिती मिळाली असून गैरव्यवहाराची रक्कम ३७ कोटी रुपयांच्या घरात आहे. फसवणूकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीने हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला. पण संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला. ‘टोरेस’ गैरव्यवहार प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसह ईडीनेही गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
union minister of state for health prataprao jadhav grab state blood transfusion council office
आरोग्य राज्यमंत्र्यांसाठी ‘एसबीटीसी’चेच संक्रमण
why donald trump want greenland who owns the island what is the role of the greenlanders
डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवे आहे? बेट कोणाच्या मालकीचे? ग्रीनलँडवासियांची भूमिका काय?
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता

हेही वाचा >>>मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर

टोरेस गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून सामान्य नागरिकांची जन्माची कमाई पळवून परदेशात नेण्यात आली आहे. ही रक्कम परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरीत करण्यात आली असून त्यासाठी बेकायदा मार्गांचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. त्यावर सध्या तपास केंद्रीत आहे. संबंधित बँक खाती व आरोपींशी संबंधित मालमत्तांची माहिती घेण्याचे काम तातडीने करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या आधारवर ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

तक्रारदार भाजी विक्रेता वैश्य (३१) यांनी याप्रकरणी सव्वा लाख नागरिकांनी टोरेस कंपनीत पैसे गुंतवल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत २००० हजार गुंतवणूकदार पोलिसांसमोर आले असून त्यामुळे फसवूकीची रक्कम ३७ कोटींवर पोहोचली आहे. ईडी याप्रकरणी फेब्रुवारी २०१३ पासून प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे. गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम रोख स्वरूपात आहे. त्यानंतर दादर येथील शाखेत रक्कम जमा करून ती कथित स्वरूपात हवाला, कूटचलनाद्वारे परदेशात पाठवण्यात आल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करीत आहे.

हेही वाचा >>>सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य

टोरेसकडून अनेक गुंतवणूक योजना राबवण्यात आल्या होत्या त्यात दर आठवड्याला सहा टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. जानेवारी रोजी, मुंबई, नवी मुंबई, आणि मीरा रोड येथील हजारो गुंतवणूकदार टोरेसच्या दादर, मीरा रोड, आणि एपीएमसी नवी मुंबई येथील शो रूम्सबाहेर जमले आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांचे व्याज थकवल्यामुळे आंदोलन केले. त्याच दिवशी शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय  मीरा भाईंदरच्या नवघर पोलीस, ठाण्याच्या राबोडी पोलीस, आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी या सर्व प्रकरणाचा मिळू तपास करणार आहे.

Story img Loader