मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक ललित शाम टेकचंदानी आणि त्याचे भागीदार अमित वाधवानी आणि विक्की वाधवानी आणि त्याच्या विरोधात दाखल प्रकणामध्ये बुधवारी छापे टाकले. छापेमारी केलेल्या ठिकाणांमध्ये टेकचंदानी, भागीदार अमित वाधवानी आणि विकी वाधवानी यांच्याशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. या तिघांनाही मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात वेगवेगळ्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांना समर्थन देत मुंबईत जोरदार घोषणाबाजी, अजित पवारांचा उल्लेख ‘घरचा भेदी’

टेकचंदानी याच्यावर मुंबई पोलिसांत सात गुन्हे दाखल आहेत. त्याला गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. टेकचंदानी यांच्याशी संबंधीत प्रकरणात ईडीने छापे टाकल्याच्या माहितीला ईडीतील सूत्रांनी दिजोरा दिला. नवी मुंबईतील तळोजा येथील गृहनिर्माण प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात ईडीही तपास करत आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात हिरा जाधवानी यांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार तळोजा येथील सुप्रीम कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्सने विकसित केलेल्या हेक्स सिटी, क्लॅन सिटी या प्रकल्पात सदनिका खरेदीच्या नावाखाली त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. २०१७-१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे आश्वासन जाधवानी यांना देण्यात आले. पण तक्रारदार यांना घराचा ताबा मिळाला नाही. याप्रकरणात तळोजा येथे दाखल प्रकरणात १६० सदनिका धारकांची ४४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. टेकचंदानी यांच्याविरोधात अनेक किमान सहा गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनेही टेकचंदानी व इतर आरोपींशी संबंधीत ठिकाणांवर छापे टाकले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate raids on places linked to builder lalit tekchandani mumbai print news zws