आसाराम बापू यांच्या ऐरोली येथील पटणी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमासाठी पाण्याचे चार टँकर पुरविणारे ठाणे महापालिकेचे उप-अभियंता प्रकाश कातखडे यांना सोमवारी सायंकाळी आयुक्त आर. ए. राजीव यांनी तडकाफडकी निलंबित केले.  एका टँकरसाठी महापालिका १२०० रुपयांचा आकार घेते. यानुसार चार टँकरसाठी होणारा आकार कातखेडे यांच्या पगारातून कापून घेण्याचे आदेशही राजीव यांनी दिले आहेत. ऐरोली येथील संत्सग सोहळा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत होत असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धुळवडीसाठी टँकर पुरविण्यास मनाई केली होती. त्यामुळे आयोजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून परवानगी घेऊन पाणी उपलब्ध करून घेतले.  कातखेडे यांनी आपल्या अधिकारात या धुळवड सोहळ्यासाठी चार टँकर उपलब्ध करून दिले.

Story img Loader