आसाराम बापू यांच्या ऐरोली येथील पटणी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमासाठी पाण्याचे चार टँकर पुरविणारे ठाणे महापालिकेचे उप-अभियंता प्रकाश कातखडे यांना सोमवारी सायंकाळी आयुक्त आर. ए. राजीव यांनी तडकाफडकी निलंबित केले. एका टँकरसाठी महापालिका १२०० रुपयांचा आकार घेते. यानुसार चार टँकरसाठी होणारा आकार कातखेडे यांच्या पगारातून कापून घेण्याचे आदेशही राजीव यांनी दिले आहेत. ऐरोली येथील संत्सग सोहळा नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत होत असतानाही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धुळवडीसाठी टँकर पुरविण्यास मनाई केली होती. त्यामुळे आयोजकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून परवानगी घेऊन पाणी उपलब्ध करून घेतले. कातखेडे यांनी आपल्या अधिकारात या धुळवड सोहळ्यासाठी चार टँकर उपलब्ध करून दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा