मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्ज नोंदणीची मुदत संपल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मंगळवारी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमांचे पुढील वेळापत्रक जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी १४ ऑगस्टला जाहीर होणार आहे तर अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) पदवी प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने मंगळवारी प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी प्रवेशासाठी यंदा १ लाख ९२ हजार ३६० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची ८ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरायचे आहेत. पहिली गुणवत्ता यादी १४ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. यंदाही प्रवेशाच्या तीन फेऱ्या असून त्यातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या तर शेवटची फेरी संस्थास्तरावर होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर आहे.
हेही वाचा : मॉडलिंगचे आमिष दाखवून तरुणीचे अश्लील चित्रीकरण, ४५ लाखांची खंडणी उकळली; तिघांविरोधात गुन्हा
बीई/ बीटेक प्रवेशाचे वेळापत्रक
- अंतिम गुणवत्ता यादी : ८ ऑगस्ट
- पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम : ९ ते ११ ऑगस्ट
- पहिली प्रवेशाची यादी : १४ ऑगस्ट
- प्रवेश निश्चित करणे : १६ ते १८ ऑगस्ट
- दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : १९ ऑगस्ट
- दुसरी यादी पसंतीक्रम : २० ते २२ ऑगस्ट
- दुसरी गुणवत्ता यादी : २६ ऑगस्ट
हेही वाचा : महाराष्ट्र सदन प्रकरणातील झोपडीवासीयांच्या इमारत पाडकामाला स्थगिती!
- दुसरी यादी प्रवेश कालावधी : २७ ते २९ ऑगस्ट
- रिक्त जागांचा तपशील : ३० ऑगस्ट
- तिसरी यादीसाठी पसंतीक्रम : ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर
- तिसरी गुणवत्ता यादी : ५ सप्टेंबर
- तिसरी यादी प्रवेश कालावधी : ६ ते ९ सप्टेंबर
- संस्थास्तर पद्धतीने : १० ते १३ सप्टेंबर
© The Indian Express (P) Ltd