आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करण्यास पालिकेची असमर्थता; मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत चिंता नाही, तरीही पाऊस वेळेवर हवाच
गतवर्षीच्या अवर्षण स्थितीमुळे एकीकडे अवघे राज्य होरपळत असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत मात्र पाण्याची ददात नाही. असे असले तरी मुंबईकरांचे पाणी राज्यातील ग्रामीण भागालाच काय, पण आसपासच्या शहरांनाही पुरवणे शक्य नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळाच्या झळांनी तहानलेल्या मुंबईलगतच्या गावांपर्यंत ते पोहोचविण्यासाठी यंत्रणाच नाही आणि रस्ते मार्गाने टँकरमधून तिथपर्यंत पाणी पोहोचविणे व्यवहार्य ठरणार नाही, अशी खंत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केली.
मुंबईला मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावांमधील उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने यापूर्वीच मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. दर दिवशी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी ३७५० दशलक्ष लिटर पाणी या धरणांमधून जलवाहिन्यांच्या माध्यमातून मुंबईत आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण झाल्यानंतर ते जलवाहिन्यांमधूनच मुंबईकरांच्या घरी पोहोचते. थेट धरणांपासून मुंबईकरांच्या घरापर्यंत जलवाहिन्यांचे जाळे पसरले आहे. आजघडीला या धरणांमध्ये तब्बल चार लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. या धरणांमधील राखीव कोटय़ासह उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत मुंबईकरांना पुरेल, असे मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मुंबईला मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी, हे पाणी राज्यातील अन्य भागांना पुरवणे
अशक्य आहे, असे मेहता म्हणाले. सर्व धरणे थेट जलवाहिन्यांनी मुंबईशी जोडली गेली आहेत. धरणांच्या आसपासच्या परिसरातील रहिवासांना पाणी मिळू शकते आणि ते दिलेही जाते. पण दूरवरच्या गावांची तहान भागविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आपल्याकडे नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
टँकरच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी पोहोचविता येईल का, असा प्रश्न विचारला असता अजय मेहता म्हणाले की, दुष्काळग्रस्त गावे दूरवर आहेत. तेथपर्यंत रस्ते मार्गाने टँकरमधून पाणी पोहोचविणे व्यवहार्य ठरणार नाही. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. थेट धरणाजवळ तशी व्यवस्था करणे योग्य ठरणार नाही. कारण धरणातील अशुद्ध पाणी शुद्ध करावे लागते. त्यासाठी ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणावे लागेल आणि शुद्ध पाणी टँकरमध्ये भरण्यासाठी तेथे स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. मात्र तशी व्यवस्था करणे पालिकेच्या दृष्टीने अव्यवहार्य ठरू शकेल, असे अजय मेहता यांनी सांगितले.

..तर पाण्याचे नियोजन करावेच लागेल
मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी धरणांमध्ये आहे. यंदा पाऊस लवकर येईल, असा काही यंत्रणांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात पावसाचे आगमन झाले नाही, तर मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ासाठी नियोजन करावे लागेल. त्यासाठी वेळप्रसंगी पाणीकपातीत वाढ करावी लागेल, असेही अजय मेहता यांनी स्पष्ट केले.

parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
maternity hospital plot for parking Borivali
बोरिवलीत प्रसूतिगृहाच्या भूखंडावर वाहनतळ; प्रसूतिगृहाची प्रतीक्षाच
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?

तलावांतील पाणीसाठय़ात फक्त १६ टक्के घट
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के पाणी साठा कमी आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, उपलब्ध जलसाठय़ात झपाटय़ाने घट झाल्यास मेमध्ये मुंबईकरांना पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागेल, अशी भीती जल विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे अपव्यय टाळून पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मोडकसागर धरणांमध्ये आजघडीला ४,०४,९४६ दशलक्ष लिटर इतके पाणी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ४,८१,६९४ दशलक्ष लिटर इतके पाणी या धरणांमध्ये होते. सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे धरणांमधील पाण्याची झपाटय़ाने घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास मुंबईकरांनाही पाणी संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader