मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा अशा दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे. मात्र या मार्गातील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, वरळीदरम्यानची मार्गिका मार्चपर्यंत सुरु करण्याचे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनचे (एमएमआरसी) नियोजन आहे. आता उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या १०० दिवसाच्या आत बीकेसी ते वरळीदरम्यानची मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करा असे निर्देश एमएमआरसीला दिले आहेत. त्यामुळे आता एमएमआरसीकडून बीकेसी ते वरळी दरम्यानच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करत मुंबईत अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निर्माण करण्याच्यादृष्टीने मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मेट्रोचे ३३७ किमीचे जाळे मुंबई महागनर प्रदेशात तयार झाल्यास एमएमआरच्या कोणत्याही एका टोकावरुन दुसऱ्या टोकाला काही मिनिटात जाता येते. अशात मेट्रो ३ मार्गिका इतर अनेक मेट्रो मार्गिकांना जोडली जाणार आहे. त्यामुळे ही मार्गिकाही शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे प्रयत्न राज्य सरकारचे आहेत. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पांच्या कामाचा आढावा नुकताच घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या वर्षात किमान ५० किमीची मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल व्हायला हवी असे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहेत. या ५० किमीच्या मेट्रोच्या जाळ्यात मेट्रो ३ च्या २१ किमीचा समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Nitin Gadkari, cable car, Mumbai metropolitan area,
मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार – परिवहन मंत्री
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Goregaon water , Goregaon citizens morcha , water,
पाणी नाही नळाला ? महापालिका कशाला ? गोरेगाववासियांचा पाण्यासाठी जनप्रक्षोभ मोर्चा
mmrda loksatta
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतरच ‘मेट्रो १’च्या अधिग्रहणाचा निर्णय रद्द
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Ramabai Ambedkar Nagar Redevelopment, Zopu Authority, huts vacant, mumbai,
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास : झोपु प्राधिकरणाकडून आतापर्यंत २५०० झोपड्या रिकाम्या

हेही वाचा – मुंबई महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार – परिवहन मंत्री

हेही वाचा – Raghav Tiwari Attecked: ‘क्राईम पेट्रोल’फेम अभिनेत्यावर मुंबईत हल्ला; कलाकाराने सांगितला धक्कादायक घटनाक्रम!

मेट्रोचा कुलाब्यापर्यंतचा टप्पा चालू वर्षात वाहतूक सेवेत दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाच शिंदे यांनी बीकेसी ते वरळी टप्पा येत्या १०० दिवसांत कार्यान्वित करण्याचे निर्देश एमएमआरसीला दिले आहे. त्यानुसार एमएमआरसीने आता कामाचा वेग वाढवला आहे. एमएमआरसीच्या एक्स या समाजमाध्यमावरील माहितीनुसार बीकेसी ते कुलाबा टप्प्याचे आतापर्यंत ९२.७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात स्थानके आणि भुयारी मार्गाचे काम ९९.१ टक्के, स्थानकांचे बांधकाम ९७.८ टक्के, यंत्रणेचे काम ७५.७ टक्के, मुख्य मार्गिकेवरील रुळांचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. संपूर्ण प्रकल्पाचा विचार करता अर्थात आरे ते कुलाबा मार्गिकेचा विचार करता संपूर्ण प्रकल्पाचे आतापर्यंत ९४.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात बांधकाम ९९.६ टक्के तर यंत्रणेचे काम ८५.५ टक्के, रुळांचे काम १०० टक्के, स्थानकांचे काम ९८.९ टक्के, कारशेडचे काम १०० टक्के आणि रुळांचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचेही एमएमआरसीकडून सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कामास वेग देण्यात आला असून मार्च-एप्रिलमध्ये बीकेसी ते वरळीदरम्यानचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, असेही स्पष्ट केले.

Story img Loader