भक्ती परब
प्रचाराच्या गमतीशीर चित्रफितींमुळे समाजमाध्यमांवर मनोरंजन; काँग्रेस-भाजपमध्ये परस्परांवर टीकेची चढाओढ
घोषणा, भाषणे, केलेल्या कामांच्या चित्रफिती, जिंगल्स, पक्षगीत, छायाचित्रे याद्वारे समाजमाध्यमांवर निवडणूक प्रचाराचा पाऊस पडत असतानाच आता ‘रॅप’ संगीतातूनही एकमेकांवर राजकीय कुरघोडय़ा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. गीत, संगीत, राजकीय नेत्यांची वक्तव्ये, त्यांचे हावभाव यांचे बेमालूम एकत्रीकरण करून बनवलेल्या चित्रफिती समाजमाध्यमांवर लोकप्रिय ठरत आहेत. हे करणाऱ्यांत केवळ राजकीय पक्षच आहेत असे नाही, तर अनेक हौशी रॅपर ‘रॅप’ गीतांतून राजकारण्यांवर फटकारे मारून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्रचीती देत आहेत.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यावर्षीही समाजमाध्यमांवर राजकीय प्रचाराचा धुराळा उडाला आहे. फक्त त्यावेळी यात भाजप आघाडीवर होती. यंदा सर्वच पक्षांना समाजमाध्यमांना महत्त्व दिले आहे. पण त्यात रॅप संगीताच्या प्रचाराचे नवे माध्यम लक्षवेधी ठरत आहे. भाजपने नवमतदारांना डोळ्यासमोर ठेवून केलेले ‘माय फर्स्ट व्होट, टू द वन, वन हू हॅज एव्हरीथिंग डन’ अशा आशयाचे रॅप गाणे व्हायरल केले. त्याला काँग्रेसने ‘चौकीदार ही चोर है, पता है हिंदूस्तान को’ नावाच्या रॅप गाण्याने उत्तर दिले. पण या कुरघोडय़ा एवढय़ावरच थांबल्या नाहीत. पुढे भाजपने ‘ये बंदा अपना सही है!’ हे रॅप गाणे आणल्यानंतर काँग्रेसने त्याला ‘काँग्रेस है ना’ने तितक्याच जोरकसपणे उत्तर दिले. या गाण्यांतून भाजप आणि काँग्रेसमध्ये आपल्या पक्षाची भूमिका पटवून देण्यासाठी लागलेली चढाओढ दिसून येते.
‘डर के आगे आजादी, भाजप से आजादी’ हे रॅप काँग्रेसने प्रसिद्ध केल्यावर भाजपने पुढच्याच ३० मिनिटांत उत्तरादाखल ‘काँग्रेस से आजादी’ नावाचे गाणे व्हायरल केले, यावरून ही स्पर्धा लक्षात यावी. काँग्रेसने ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचा आधार घेत इन्स्ट्राग्रामवर लाइव्हचा पर्याय स्वीकारून काही रॅप गाणी पोस्ट केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
मुळात याची सुरुवात काही हौशी रॅपर्सच्या गाण्यांनी झाली. ‘बियाँड डिजिटल स्टुडियो’ यांनी सर्वप्रथम ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील संघर्ष दाखवणारे विडंबनात्मक रॅप केले. ते इतके व्हायरल झाले की त्यानंतर ‘गल्ली बॉय’ चित्रपटाचा आधार घेऊ न तयार केलेली आणखी सात ते आठ रॅप गाणी आली. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. बियाँड स्टुडियोजचे फैजान सिद्दिकी म्हणतात, २०१७ पासून आम्ही राजकीय जाहिराती करत आहोत. त्याआधी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधील नेत्यांसाठी आम्ही जाहिराती केल्या आहेत. यावेळेस रॅप गाण्यांना मागणी आहे. आम्ही राजकारणातल्या सद्य:स्थितीचा आढावा घेत तीन आठवडे वेळ घेऊन ते रॅप केले होते.’ बियाँड स्टुडिओजसारख्या संस्था एका सेकंदाकरिता १५०० रुपये इतका मोबदला घेतात.
रॅपर्सना रोजगार
या गाण्यांच्या माध्यमातून रॅपर्सनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. ‘एखादे गाणे प्रादेशिक भाषेतील मतदारांना उद्देशून करायचे असल्यास ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो,’ असे एम. सी. आझाद या रॅपरने सांगितले. तर ‘देशातील समस्त नागरिकांना उद्देशून गाणे करायचे असल्यास १ ते २ लाख एवढे पैसे आकारले जातात,’ असे राजकीय पक्षांकरिता रॅप गाणी तयार करणारा रॅपर अंकित हर्चेकर याने सांगितले.
मतदार जागृतीसाठी ‘रॅप’
राजकीय प्रचाराबरोबरच मतदार जागृतीसाठीही काही लोकप्रिय रॅपर गाणी करत आहेत. अविसार, मि. लव्हीज यांनी ‘इलेक्शन रॅप २०१९’, ‘ये पॉलिटिकल खीर है’ नावाचे रॅप गाणे (असिफ सिलवत) तर देब बी आणि अल्मायटी या रॅपर्सनी मतदान करणे किती आवश्यक आहे, हे पटवून देण्यासाठी एक रॅप गाणे आणले आहे. अशी जवळपास १० ते १२ रॅप गाणी पाहता येतात.