मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघातही मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही विधानसभा निवडणुकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धारावीतील रस्त्यांच्या दुतर्फा आणि चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे धारावीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दरम्यान, धारावीच्या गल्लीबोळातील बहुसंख्य दुकाने ही मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी धारावीतील रस्त्यांवर काहीसा शुकशुकाट दिसत होता. धारावीत वस्त्यावस्त्यांमध्ये विविध सोयी-सुविधांसह मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या मतदान केंद्रांवर शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांचा ओघ दिसत होता. तसेच ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांचे माहिती देणारे कक्ष उभारण्यात आले होते आणि या कक्षांभोवती निरनिराळ्या शंकांचे निरसन करण्यासाठी नागरिकांचे घोळके जमलेले दिसत होते. धारावी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या ज्योती एकनाथ गायकवाड, महायुतीतील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) राजेश खंदारे आणि बहुजन समाज पक्षाचे मनोहर रायबागे निवडणूक लढवत आहेत.

delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
AAP
Delhi Election : ‘आप’मधून बाहेर पडलेल्या ८ आमदारांचा भाजपामध्ये प्रवेश, कालच सोडला होता पक्ष
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
Arvind Kejriwal On Delhi Election
Delhi Elections : दीड महिना आधीच खुलेआम पैसे वाटप सुरू; केजरीवालांचा आरोप
भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार?
The Election Commission's rate card for Delhi Assembly elections sets spending limits on various items, from pens to elephants.
छोले भटूरे ३५ रुपये तर रॅलीतील हत्तीसाठी ६१५० रुपये, दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करता येणार?

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : सोयी-सुविधांमुळे मतदान सुसह्य; मतदारांमध्ये मात्र निरुत्साह

काँग्रेसने ज्योती गायकवाड यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशीही उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांचे पती राजू गोडसे, स्वतः उमेदवार ज्योती गायकवाड आणि त्यांचे पती गणेश गिरीगोसावी हे धारावी विधानसभा मतदारसंघात फिरून मतदान केंद्रावरील प्रक्रियेचा आढावा घेत होते. तसेच मतदान संपण्याच्या शेवटच्या क्षणी ज्योती गायकवाड यांनी धारावीतील महात्मा गांधी मार्गावरील ‘धारावी ट्रान्झिट कॅम्प’ शाळेतील मतदान केंद्राला भेट देऊन आढावा घेतला, तेव्हा मतदारांना त्यांच्याशी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. इतर उमेदवारांनीही मतदानाच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला. विशेष बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीलाही रंगाचा अभिनव आणि कल्पकतेने वापर करून सजवलेले ‘धारावी ट्रान्झिट कॅम्प’ शाळेतील मतदान केंद्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या मतदान केंद्रावर शेवटच्या क्षणीही मतदारांचा ओघ वाढला होता.

Story img Loader