ॲक्सिस बँकेची ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ६३ वर्षीय सराफाला अटक केली. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात सराफ अपयशी ठरला होता. याप्रकरणी बँकेने केलेल्या पडताळणीत कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर याप्रकणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. हेमंत व्रजलाल झवेरी (६३) असे अटक आरोपीचे नाव असून राहते घर विकून तो गायब झाला होता.

हेही वाचा >>> मुंबईः निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती. त्याला मुलुंडमधील एका सदनिकेतून अटक करण्यात आली. याप्रकरणी ॲक्सिस बँकेने कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली होती. आरोपीने २०१५ मध्ये सराफ कंपनीची स्थापना केली होती. बँकेने सप्टेंबर २०१५ मध्ये आरोपीच्या कंपनीला ३६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. २०१८ पर्यंत सर्व सुरळीत सुरू होते. पण त्यानंतर कर्जाचे हफ्ते येणे बंद झाले. २०१९ मध्ये बँकेने हे कर्ज बुडीत घोषित केले. याप्रकरणी करण्यात आलेल्या लेखापरीक्षणमध्ये काही अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर याप्रकरणी फसवणूक, फौजदारी विश्वास भंग, कट रचणे यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी झवेरीला अटक करण्यात आली.