मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १७० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने ३६ वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपीने तक्रारदार व इतर गुंतवणूकदारांची सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सिद्धार्थ पिलानी असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात यापूर्वीही १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तक्रारदार चितकरण खुराना हा प्रसिद्ध अंकशास्त्र व वास्तुशास्त्र सल्लागार बिंदू खुराना यांचा मुलगा आहे. त्याचीही आरोपीने ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपीने एकूण १७० व्यक्तींना चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून सात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीने कॅपिटल बर्ज नावाची कंपनी असल्याचे सांगितले होते. पण या कंपनीची कुठेही नोंद नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

सुरुवातीला आरोपीने चांगला परतावा दिला. त्यानंतर २०२१ ते २०२२ या कालावधीत आरोपीने कोणताही परतावा न दिल्याने सर्व गुंतवणूकदारांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार एप्रिल महिन्यात याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिलानीला नुकतीच अटक केली.  गुंतवणूकदारांमध्ये गृहिणीपासून अगदी मोठय़ा व्यावसायिकांनीही समावेश आहे. त्यातील बहुसंख्य व्यवहार रोख रकमेत करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी गुंतवणुकीचे पुरावे म्हणून कागदपत्रे पाठवत होता. त्यानुसार १७० गुंतवणूकदारांचे २० कोटी रुपये बुडाल्याचा आरोप केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.