मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) ७०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) यशस्वीपणे उभारणी करण्यात आली आहे. एका रात्रीत दुसऱ्या टप्प्यातील १२ व्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे काम पूर्ण करून एमएमआरडीएने प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. ७४ मी लांब अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकच्या उभारणीनंतर आता प्रकल्पाचे एकूण ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई पारबंदर प्रकल्प; ७०० मेट्रिक टन ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची एका रात्रीत उभारणी
मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) ७०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) यशस्वीपणे उभारणी करण्यात आली आहे.
Written by अक्षय येझरकर
First published on: 23-11-2022 at 18:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Erection of 700 mt orthotropic steel deck at mumbai parbandar project mumbai print news amy