मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे उदघाटन आज (सोमवार) पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. हा जीना डोंबिवली पूर्वेकडील स्थानकाबाहेर बसविण्यात आला आहे. तसेच हा जीना जॉन्सन या कंपनीने फक्त पन्नास दिवसात बनविला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले. या जीन्यासाठी एकूण ७५ लाख रूपये खर्च आला आहे.
या उदघाटन कार्यक्रमाला खासदार आनंद परांजपे, रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम, आमदार रवींद्र चव्हाण, विशेष कार्यकारी अधिकारी राजीव त्यागी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी ठाण्यातील रेल्वे स्थानकावर असे दोन सरकते जीने बसविण्यात आले आहेत.

Story img Loader