नालासोपाऱ्यात एका इस्टेट एजंटची अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली. संजय र्मचट (४०) असे मृताचे नाव आहे. नालासोपाऱ्याच्या सेंट्रल पार्क येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
संजय र्मचट यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क येथील नील व्ह्य़ू अपार्टमेंट या इमारतीत तळमजल्यावर ते राहत होते. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरातून बाहेर पडताच इमारती बाहेर दबा धरून बसलेल्या व्यक्तीने र्मचट यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या. गोळी थेट डोक्यात घुसल्याने ते जागीेच कोसळले. उपचारासाठी र्मचट यांना अलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पालघरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कोकाटे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलीे. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हल्लेखोर र्मचट यांच्या परिचयाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा