ठाणे येथील धर्मवीरनगर भागातील एका घरामध्ये शिरून मायलेकींचा विनयभंग करणाऱ्या तरुणास कापूरबावडी पोलिसांनी अटक केली असून या तरुणाने एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अजय टाक (२५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील गांधीनगर भागात राहतो. यातील पीडित महिला ४२ वर्षांची तर तिची मुलगी १६ वर्षांची आहे. या मायलेकी पूर्वी गांधीनगर भागामध्ये राहत होत्या. सध्या त्या धर्मवीरनगर भागामध्ये राहतात. मंगळवारी सायंकाळी या दोघी घरामध्ये होत्या. त्या वेळी अजय याने जबरदस्तीने घरामध्ये शिरून महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या मुलीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केली.
तसेच त्याने बाजूच्या घराच्या खिडकीची काचही फोडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजय आणि पीडित मुलगी पूर्वी एकाच परिसरात राहत होते, अजय तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता, त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एस. आर. भांडवलकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 कारचालकास अटक
 शहर वाहतूक शाखेच्या पोलीस शिपयासोबत हुज्जत घालून त्यास धक्काबुक्की करून शिवीगाळ करणाऱ्या मर्सीडीजच्या कारचालकास नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
पीयूष हरीष ग्रोसर (३३, रा. मुलुंड) असे यातील मर्सिडीज कारचालकाचे नाव असून त्याने मंगळवारी तलावपाळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयासमोरील रस्त्यावर मर्सिडीज कार उभी केली होती. ही कार ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी असल्याने वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई विजय सपकाळ हे कारला जॅमर लावत होते. त्या वेळी पीयूष याने त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली
येथील नौपाडा भागातील एका इमारतीमध्ये ७० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटय़ांनी खेचून नेल्याचा प्रकार मंगळवारी घडला असून या घटनेमुळे शहरात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय होऊ लागल्याचे उघड झाले आहे.
नौपाडा भागातील शिवाजीनगरमध्ये दिवाली रांभिया (७०) राहत असून त्यांची आई लक्ष्मी माला या नौपाडा परिसरातील नाईकवाडीमधील गुरुप्रेरणा इमारतीत राहतात. मंगळवारी दिवाली या त्यांच्या आईच्या घरी जाण्यासाठी इमारतीचे जिने चढत होत्या. त्या वेळी पाठीमागून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील ९८ हजार रुपयांची सोनसाखळी खेचून नेली.

उसनवारी पैशांवरून हल्ला
मुंब्रा येथील नारायणनगर भागात सोमवारी उसनवारी घेतलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून एकावर ब्लेडने हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी हल्लेखोरास अटक केली आहे. ताहीर गुलाम शेख, असे  अटक करण्यात आलेल्या  युवकाचे नाव आहे.