घाटकोपरमध्ये जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काल रात्री (दि. १५ मे) समोर आली. यामुळे आता मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे. काल एका वाहनातून मनोज चांसोरिया (वय ६०) आणि त्यांची पत्नी अनिता चांसोरिया (वय ५९) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मनोज चांसरिया हे मुंबईतील विमानतळाचे माजी विमानतळ संचालक (Air Traffic Control – ATC) होते. जाहिरातीचे होर्डिंग कोसळले तेव्हा इतर १०० लोकांसारखे तेही पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आले होते. मनोज चांसरिया यांनी मुंबईच्या एटीसीमध्ये काम केले होते. वर्षभरापूर्वीच निवृत्त झाल्यानंतर ते पत्नीसह जबलपूर येथे वास्तव्यास होते.

चांसोरिया दाम्पत्याच्या मृत्यूमुळे मुंबईमधील एटीसी विभागातील कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, अशी आठवण इतर कर्मचाऱ्यांनी सांगितली. चांसोरिया दाम्पत्याचा मुलगा अमेरिकेत आहे. तेही काही दिवसांनी देशाबाहेर जाणार असल्यामुळे व्हिसासंबंधी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले होते. व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करून जबलपूरला परत जात असताना वाटेत इंधन भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले आणि तेवढ्यात काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Boy killed in gas cylinder blast karad
गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटामध्ये मुलगा ठार; उंडाळेतील भीषण दुर्घटना
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू

VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!

सोमवारी (१३ मे) जेव्हा दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळला, तेव्हापासून चांसोरिया यांचा मोबाइल फोन बंद झाला होता. त्यांचा मुलगा अमेरिकेतून फोन करत असताना फोन बराच वेळ बंद असल्याचे कळल्यानंतर मुलाने मुंबईतील मित्रांना याबाबत माहिती दिली आणि चांसोरिया यांचा शोध घेण्याची विनंती केली. मित्रांनीही तात्काळ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत शोध सुरू केला. पोलिसांनी चांसोरिया यांचा फोन ट्रॅक केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर दाखविण्यात आले.

ही माहिती मिळाल्यानंतर चांसोरिया यांचे नातेवाईक, मित्रपरिवाराने दुर्घटनास्थळी धाव घेतली. चांसोरिया बचावतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र काल रात्री ही दुःखद बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त जबाबदार? २०२३ ला उघडकीस आलं होतं प्रकरण!

अखेर बचाव कार्य थांबविले

सोमवारपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून होर्डिंगखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता. ही शोध मोहीम गुरुवारी (दि. १६ मे) सकाळपर्यंत सुरू होती. मात्र हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले असून सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर मदतकार्य पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच दिवसभर ढिगारा हटविण्याचे काम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजावाडी रुग्णालयात युद्धपातळीवर व्यवस्था

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनेनंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात मोठ्या रुग्णांना नेण्यात येत होते. या रुग्णांना तात्काळ तळमजल्यावर उपचार मिळावे यासाठी रुग्णालय प्रशासनाने युद्धपातळीवर त्याबाबत व्यवस्था केली. सर्व कर्मचारी एकदिलाने कामाला लागून तळमजल्यावरील एक जागा मोकळी केल्यामुळे वेगाने उपचार करणे शक्य झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.