मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजात विकासनिधीच्या वाटपात प्रशासनाने भाजपला झुकते माप दिल्याचे उघड झाल्यानंतर आता हळूहळू इतर राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी जागे होऊ लागले आहेत. शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी निधी वाढवून मिळावा अशी मागणी गुरुवारी केली. तर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी करणारे पत्र शुक्रवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हे पत्र आयुक्तांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विकास निधी वाटपाबाबत प्रशासकांनी भाजपला झुकते माप दिल्याची बाब उघडकीस आली असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. भाजपच्या ७७ नगरसेवकांच्या आणि २ नामनिर्देशित नगरसेवकांच्या प्रभागातील विविध नागरी कामासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात प्रत्येकी तीन कोटी रुपये याप्रमाणे एकूण २३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर उर्वरित १५० प्रभागाकरिता प्रत्येकी केवळ एक कोटी रुपये याप्रमाणे १५० कोटी रुपये, तर १० नामनिर्देशित नगरसेवकांकरिता एकूण १४ कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मैदानासाठी आरक्षित भूखंडावरील ३२ बांधकामांवर हातोडा, चेंबूरमधील जिजामाता नगरात महानगरपालिकेची कारवाई

या निधी वाटपात भाजपला जास्त निधी देण्यात आला असून शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष यांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांसाठी कमी निधी देण्यात आला आहे. भाजपच्या माजी गटनेत्यांनी पत्र दिल्यामुळे त्यांना निधी वाढवून दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे माजी गटनेते निधी वाढवून द्यावा अशी मागणी करू लागले आहेत. शिवसेनेनेच्या माजी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी तीन कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी केली. त्यापाठोपाठ गुरुवारी रवी राजा यांनीही महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून काँग्रेसच्या २७ माजी नगरसेवकांच्या प्रभागात तीन कोटी रुपये विकासनिधी देण्याची मागणी केली आहे. विविध पायाभूत, मुलभूत व नागरी सुविधा पुरविणे तसेच विकास कामांसाठी या शिर्षांतर्गत ही तरतूद करण्यात येते. या शीर्षांतर्गत असलेली कामे या पत्रात सुचवण्यात आली आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex corporators congress want rs 3 crore development fund ex opposition leaders letter to municipal commissioner mumbai print news ysh
Show comments