मुंबई : पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच ‘पेट’ वर्षातून एकदा घेणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने दोन वर्ष उलटल्यानंतर रविवारी घेतली. मात्र या परीक्षेदरम्यान विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा आणि तांत्रिक अडचणींच्या मालिकेचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परिणामी, तांत्रिक बिघाडामुळे डोंबिवलीतील एका परीक्षा केंद्रावरील ‘पेट’ आणि ‘एलएलएम‘ प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, २४ नोव्हेंबर रोजी घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे. तसेच तांत्रिक बिघाडामुळे विविध केंद्रांवरील ‘पेट’ दोन ते तीन तास उशीराने सुरू झाली. विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागला असून समाजमाध्यमांवर विद्यापीठावर टीकेचे ताशेरे ओढले गेले.

मुंबई विद्यापीठातर्फे ‘पेट’ सकाळच्या सत्रात १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासाच्या कालावधीत, तर ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा दुपारी ३ ते ४ या एक तासाच्या कालावधीत घेणे नियोजित होते. त्यासाठी परीक्षार्थींना परीक्षेच्या १ तास आधी संबधित परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक असल्यामुळे ‘पेट’साठी विद्यार्थी सकाळी ९.३० वाजताच परीक्षा केंद्रांवर पोहोचले. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले होते.मात्र संबंधित कंपनी व विद्यापीठाचे ढिसाळ नियोजन विद्यार्थ्यांनी अनुभवले.

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Both exams held statewide school registration and student applications were open from October 17 to December 7
विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,

हेही वाचा >>>…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन

विद्यार्थ्यांचा संताप

कांदिवलीतील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी ‘भारतीय शिक्षणपद्धतीचा निषेध असो’ अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाने स्वत:च्या यंत्रणेमार्फत परीक्षा का घेतली नाही? खासगी कंपनीला का कंत्राट दिले? खासगी इन्स्टिट्यूट परीक्षा केंद्र म्हणून का ठेवण्यात आली? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आले.

प्रशासनाने काय म्हटले

 दरम्यान, खासगी कंपनीच्या यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे काही केंद्रांवर परीक्षा उशीरा सुरु झाली. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वाढीव वेळ देण्यात आला’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

– ‘पेट’साठी अर्ज केलेल्या ५ हजार ५५४ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ हजार ५६६ विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच ‘एलएलएम‘ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ५ हजार ७७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ८९२ विद्यार्थी अनुपस्थित होते.

 डोंबिवलीतील सुरेखा इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तांत्रिक कारणामुळे ५२६ विद्यार्थ्यांची ‘पेट’ आणि ५२४ विद्यार्थ्यांची ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे फक्त डोंबिवलीतील केंद्रावरील परीक्षार्थींसाठी रविवार,२४ नोव्हेंबर रोजी ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ हे सुधारीत प्रवेश पत्राच्या (हॉल तिकिट) माध्यमातून स्वतंत्ररित्या लॉगिन व ई-मेलद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली.

हेही वाचा >>>पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

खासगी यंत्रणेचा भोंगळ कारभार

‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या खासगी यंत्रणेने महाविद्यालयाऐवजी एका संगणक क्लासमध्ये परीक्षा घेतल्याचे आढळून आले आहे. या भोंगळ कारभाराची कसून चौकशी करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच या ढिसाळ नियोजनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून कुलगुरु किंवा परीक्षा नियंत्रकांनी राजीनामा द्यावा’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. तर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मुंबई विद्यापीठाने दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या युवा सेनेचे उपसचिव अॅड. सचिन पवार यांनी केली आहे.

विविध अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांची मन:स्थिती ढासळली

‘पेट’ सकाळच्या सत्रात १०.३० वाजता सुरु होणे अपेक्षित होते. परंतु मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे काहींची ११.१५, ११.३०., १२.१५, १२.३० अशा विविध वेळेत परीक्षा सुरू झाली. एकाही विद्यार्थ्याची हजेरी व्यवस्थित घेतली गेली नाही. अनेक संगणकांमध्ये तांत्रिक बिघाड होता. बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असणाऱ्या या परीक्षेत उत्तरांचे काही पर्यायही चुकीचे होते. या परीक्षेसाठी अडथळ्यांचा सामना करावा लागल्यामुळे विद्यार्थ्यांची मन:स्थिती ढासळली’, असे कांदिवलीतील एका केंद्रावरील विद्यार्थिनीने सांगितले.

मूलभूत सोयीसुविधांचा अभाव

‘पेट’ सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होती, मात्र आम्हाला सकाळी ९.३० वाजता बोलवून १०.१५ वाजता प्रवेशद्वाराच्या आत घेतले. सर्व विद्यार्थी परीक्षा वर्गात जाईपर्यंत ११ वाजले. काही ठिकाणी बैठक क्रमांकच लिहिले नसल्यामुळे कोणी कुठेही बसत होते. इंटरनेट व सर्व्हर दोन्ही डाऊन होते. ‘पेट’ १५ मिनिटांत सुरु होईल, असे म्हणेपर्यंत दुपारचे ३ वाजले मात्र परीक्षा काही झाली नाही. परीक्षेच्या वर्गात पाण्याची व्यवस्था नव्हती. ५० ते ६० विद्यार्थी बसणाऱ्या वर्गात २ पंखे होते. वातानुकूलित यंत्रणा व्यवस्थित कार्यरत नव्हती. डोंबिवलीतील परीक्षा केंद्रावर दुपारच्या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांचा भडिमार करत त्यांना जाब विचारला’, असे एका विद्यार्थ्याने सांगितले

डोंबिवली केंद्रावरील परीक्षा पुढील रविवारी घेण्याची नामुष्की

विद्यापीठांतर्गत विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पूर्वपात्रता (पेट) ऑनलाइन परीक्षा वेळेत सुरू न झाल्याने डोंबिवलीतील केंद्रावरही गोंधळ उडाला होता.

डोंबिवली एमआयडीसीतील सुरेखा एन्फोटेक हे परीक्षा केंद्र मुंबई विद्यापीठाकडून निश्चित करण्यात आले होते. या परीक्षा केंद्रावर रविवारी सकाळी साडेदहा वाजता घेण्यात येणारी पेट परीक्षा तांत्रिक कारणामुळे वेळेत सुरू झाली नाही. सकाळी साडेदहा वाजता सुरू होणारा पेपर साडेअकरा वाजले तरी सुरू न झाल्याने परीक्षार्थी प्राध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तांत्रिक कारणामुळे पेपर सुरू होण्यास उशीर होत असल्याची माहिती परीक्षार्थींना परीक्षा पर्यवेक्षकांकडून देण्यात येत होती. यामुळे विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. या प्रकारामुळे केंद्रावर गोंधळही उडाला होता.

अखेरीस तांत्रिक बिघाडामुळे डोंबिवलीतील एका परीक्षा केंद्रावरील ‘पेट’ आणि ‘एलएलएम‘ प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, २४ नोव्हेंबर रोजी घेण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली.

सर्व्हर डाऊन

मुंबईसह, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी विविध भागांतून तसेच काही विद्यार्थी परराज्यातूनही ही परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. मात्र कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालय असो किंवा डोंबिवलीतील सुरेखा इन्फोटेक आदी विविध केंद्रांवर सर्व्हरच डाऊन झाले. त्यामुळे विविध परीक्षा केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते.

प्रशासनाने काय म्हटले

● खासगी कंपनीच्या यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे काही केंद्रांवर परीक्षा उशीरा सुरु झाली. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वाढीव वेळ देण्यात आला’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.

● ‘पेट’साठी अर्ज केलेल्या ५ हजार ५५४ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १ हजार ५६६ विद्यार्थी अनुपस्थित होते. तसेच ‘एलएलएम‘ प्रवेशपूर्व परीक्षेसाठी ५ हजार ७७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ८९२ विद्यार्थी अनुपस्थित होते.

डोंबिवलीतील सुरेखा इन्फोटेक केंद्रावरील पेट परीक्षाचा पेपर काही तांत्रिक कारणामुळे वेळेत सुरू झाला नाही. तांत्रिक बिघाड सोडविण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. इतर सर्व २० केंद्रांवर सुरळीत परीक्षा सुरू झाली आहे. सुरेखा इन्फोटेक केंद्रावरील सर्व परीक्षार्थींना तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला की परीक्षा देता येणार आहे. त्यांना वेळ वा़ढवून दिली जाईल. विद्यार्थी लॉगिन करतील त्या वेळेपासून पेपर सोडविण्याची आणि संपण्याची वेळ निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी चिंता करू नये.- लीलाधर बनसोड, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ.

Story img Loader