मुंबई : पनवेल – कर्जत नवीन रेल्वे मार्गातील सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या ठाणे – दिवादरम्यानचा पारसिक बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा आहे.

मुंबईतील वाहतुकीवर ताण आल्याने प्रवाशांना प्रवास करणे गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे मुंबईवरून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून पनवेल येथून थेट लोकलने कर्जत गाठणे शक्य होणार आहे. तसेच कर्जत हे मुंबई-पुण्याला जोडणारे ठिकाण आहे. त्यामुळे कर्जतमध्ये लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे कर्जतवरून जलद गतीने लोकलने जाता यावे, यासाठी पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. येत्या दोन वर्षात हार्बर मार्गावरील सीएसएमटी स्थानकावरून पनवेलमार्गे थेट कर्जत गाठणे शक्य होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. या रेल्वे मार्गात ३,१६४ मीटर लांबीचे नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे आहेत. यापैकी नढाल येथील बोगद्याची लांबी २१९ मीटर आणि किरवली येथील बोगद्याची लांबी ३०० मीटर आहे.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ratnagiri Lohmarg Police Station begin operations at Ratnagiri Railway Station on Republic Day
प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वेवर लोहमार्ग पोलीस ठाणे उभे राहणार, रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात १४० पोलिसांचा ताफा
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…

हेही वाचा…ईडीने जप्त केलेली १८० कोटींची मालमत्ता प्रफुल्ल पटेलांना परत मिळणार; ‘वॉशिंग मशीनची कमाल’, राऊतांचा आरोप

५० टक्के काम पूर्ण

पनवेल-कर्जतदरम्यान सुमारे २९.६ किमी लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गात दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. या मार्गिकेसाठी २,७८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सध्या एकूण ५० टक्के कामे पूर्ण झाली असून डिसेंबर २०२५ पर्यंत दुहेरी मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे.

हेही वाचा…मुंबई : १७ कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा

बोगद्याचे खोदकाम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याची कालमर्यादा होती. मात्र काटेकोर नियोजनामुळे ७ जून रोजीच खोदकाम पूर्ण केले. आता बोगद्यातील अन्य कामे करण्यात येणार आहेत. वावर्ले बोगदा तयार करताना न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. – सुभाषचंद्र गुप्ता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

Story img Loader