मुंबई : राज्यातील परमीट रूम व बारमध्ये ग्राहकांना दिले जाणारे भेसळयुक्त मद्य ओळखणे सोपे जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा आतापर्यंत फक्त मद्य उत्पादकांकडे होती. ही यंत्रणा आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आली आहे.
राज्यात ११ हजारहून अधिक परमीट रूम आणि बार आहेत. पंचतारांकित हॉटेल्स, क्लब वा फाईन डाईन रेस्तराँ वगळता काही परमीट रूममध्ये भेसळयुक्त मद्य दिले जात असल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. याबाबत तक्रारी आल्यानंतर कारवाई केली जात होती. परंतु तरीही बारमालक भेसळयुक्त मद्याच्या वितरणात आघाडीवर होते. याबाबत कारवाईसाठी आवश्यक असलेली यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे या परमीट रूम व बारवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला मद्यातील भेसळ ओळखणारी यंत्रणा हवी होती. अखेर अशी मद्य उत्पादकांकडून वापरली जात असलेली यंत्रे खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिली होती. ही यंत्रे आता उत्पादन शुल्क विभागात उपलब्ध झाली आरे. त्यामुळे आता भरारी पथक वा इतर अधिकाऱ्यांना कुठल्याही रेस्तराँ बारमध्ये जाऊन भेसळयुक्त मद्य ओळखता येणार आहे.
मद्य उत्पादकांकडून ‘अँटन पार’ हे जर्मन बनावटीचे तपास यंत्र मद्याची तीव्रता व प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. या डिजिटल यंत्रामुळे मद्याचे प्रमाण एक ते चार मिनिटात शोधणे शक्य आहे. ही यंत्रे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने खरेदी केली असून राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत या यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे भेसळयुक्त मद्य ओळखणे आता उत्पादन शुल्क निरीक्षकांना शक्य होणार आहे. या भेसळीमुळे राज्याच्या उत्पादन शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होत होता. तो आता टाळता येईल आणि ग्राहकांनाही मद्याचा आस्वाद लुटता येईल, असा दावा अधिकाऱ्याने केला.
भेसळ कशी उघड होणार?
- परमीट रूममध्ये अधिक नफा कमावण्याच्या हेतूने मद्यात पाणी मिसळण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. एका मद्याच्या बाटलीपासून दोन बाटल्या मद्य अशा पद्धतीने तयार केले जाते. नव्या यंत्रामुळे मद्याची तीव्रता तत्काळ तपासता येणार असल्यामुळे हा प्रकार उघडकीस येईल.
- बऱ्याच वेळा ब्रँडेड मद्याच्या बाटलीत अन्य मद्य भरले जाते व ते ग्राहकांना दिले जाते. असे प्रकारही या यंत्रामुळे शोधता येणार आहेत.