शूर्पापक – सुप्पारक – सोपारा असा अपभ्रंश होत तयार झालेले हे नाव. आणि आताचे मुंबईच्या उपनगरातील ठिकाण म्हणजे नालासोपारा. सोपारा आणि त्याच्या बाजूला असलेले विरार या दोघांनाही सुमारे अडीचहजार वर्षांहून जुना इतिहास आहे. प्राचीन मुंबईतील ही व्यापारी ठाणी होते. आणि या व्यापारावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते ते म्हणजे जीवदानीचा डोंगर. उत्तरेस बोरिवलीपर्यंत तर दक्षिणेस पालघर- डहाणूपर्यंतच्या टापूवर इथूनच नजर ठेवली जायची. या जीवदानीच्या मंदिराच्या एका बाजूस असलेली प्राचीन लेणीही ही या अडीचहजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत.
Video : गोष्ट मुंबईची – प्राचीन व्यापाराचा अडीचहजार वर्षांचा इतिहास
सोपारा आणि त्याच्या बाजूला असलेले विरार या दोघांनाही सुमारे अडीचहजार वर्षांहून जुना इतिहास आहे. प्राचीन मुंबईतील ही व्यापारी ठाणी होते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 10-06-2023 at 10:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive video of goshta mumbaichi history of mumbai nalasopara pbs