‘कोहिनूर मिलची जागा माझ्या मालकीची नाही. ही जागा माझ्या मुलाच्या मालकीची असून या जागेत माझा काहीही हस्तक्षेप नाही’ असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केले आहे. कोहिनूर मिलच्या जागेची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी केलेली मागणी अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शिवाजी पार्कवरील चौथरा न हटविण्याच्या आपल्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीच्या कार्यक्रमानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
आणखी वाचा