साधारण १९४७ साली कुलाबा येथील होरमुसजी मार्गावर कपडय़ांची बाजारपेठ सुरू झाली. एकीकडे १९०३ साली बांधण्यात आलेले पंचतारांकित ताजमहाल तर दुसरीकडे मासळीच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेले ससून डॉक असल्याने कुलाब्यात व्यापार करणे सोपे होते. ताज महल हॉटेलात परप्रातांतून येणारे पर्यटक कुलाबा बाजारातच खरेदी करीत असे. सुरुवातीला येथे केवळ कपडय़ांचा व्यापार केला जात होता. सुरतहून येणारा कपडय़ांचा माल बंदराजवळ उतरून थेट कुलाब्याच्या बाजारात विक्रीस आणला जात होता. मात्र कालांतराने ग्राहकानुसार बाजारात येणाऱ्या वस्तू बदलल्या आणि खास ‘पाश्चिमात्य संस्कृती’साठी कुलाबा ओळखला जाऊ लागला.

दक्षिण मुंबईतील सर्वाधिक चर्चिला जाणारा भाग म्हणजे ‘कुलाबा’. परदेशी पर्यटक, नायजेरियन नागरिकांची वाढती संख्या, ड्रग्जची बेकायदेशीर विक्री यांसारख्या अनेक चांगल्या-वाईट कारणांसाठी कुलाबा बाजार ओळखला जातो. या परिसरातच परदेशींसाठी निवासीगृहेही तयार करण्यात आली आहे. कुलाब्यात मोठय़ा प्रमाणात परदेशी पर्यटक येतो. ‘लिओपोर्ड कॅफे ’ हे कुलाब्याचे आणखी एक आकर्षणाचे केंद्र. परदेशी नागरिकांमध्ये लिओपोर्ड कॅफेबाबत आकर्षण आहे. २६ नोव्हेंबर २००८ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक परदेशी नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर काही काळ कॅफे बंद ठेवण्यात आला होता. मात्र काही वर्षांपूर्वी हा कॅफे जोमाने सुरू झाला. आजही या कॅफेत भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांचे निशाण पाहावयास मिळते.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Eat Right Station certification is awarded by FSSAI
रेल्वे स्थानकावर आता बिनधास्त खा! पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह १० स्थानके ‘ईट राइट स्टेशन’
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

कुलाबा बाजाराच्या रस्त्याच्या दुतर्फा पाश्चिमात्य कपडे, दागिने व हॉटेल यांची रांग दिसते. या रस्त्याच्या फूटपाथवरच फेरीवाल्यांचीही मोठी रांग दिसते. आधुनिक व पारंपरिक असा मिलाफ असलेल्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी या परिसरात महाविद्यालयीन मुलींची मोठी गर्दी असते. फुटपाथवरच प्लास्टिकचे छप्पर लावून फेरीवाले विक्री करतात. झुमके, चांदबाली, पाश्चिमात्य पद्घतीचे टी-शर्ट, कुडते, पॅण्ट आदी फॅशनेबल कपडे येथे सहज उपलब्ध होतात. या परिसरात २० प्रकारच्या ब्रॅण्डची दुकाने आहेत. मात्र मोठ मोठय़ा ब्रॅण्डची दुकाने असतानाही फेरीवाल्यांकडेच अधिकतर ग्राहक खरेदी करण्यासाठी येत असतात. स्वस्त दरात फॅशनेबल कपडे मिळत असल्याने मुंबई उपनगरातूनही खरेदी करण्यासाठी या बाजाराकडे पावले वळतात. कुलाबा मार्केटमध्ये सुमारे ३०० हून अधिक दुकाने असून ४०० हून अधिक फेरीवाले आहेत. नवरात्रौत्सवासाठी कुलाबा बाजारात खास चनिया चोली, घागरा यावरील आभूषणांची मांदियाळी आहे. मोठय़ा आकारांचे झुमके, चांदबाली, छोटय़ा पारंपरिक रंग चढविलेल्या पर्सेस, गळ्यातील माळा, पैंजण असे अनेक दागिने विक्रीस उपलब्ध आहे. झुमक्यांची किंमत साधारण १०० रुपयांपासून सुरू होते. नव्या फॅशनच्या झुमक्यांची किंमत मात्र २०० ते २५० रुपयांपर्यंत आहे. किमती कमी करण्याचे कौशल्य असल्यास हेच २५० रुपयांचे दागिने तुम्हाला १५० रुपयांपर्यंत सहज मिळते.

मुंबईत नवरात्र सुरू झाल्यामुळे नऊ दिवसांच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांपासून अगदी सर्वच वयोगटांतील महिला सहभागी झाल्या आहेत. या बाजारात येणारे अधिकतर दागिने राजस्थान, दिल्ली, मुरादाबाद या भागातून आणले जातात. इतर बाजारांप्रमाणे येथे विक्री करण्यासाठी उत्तर प्रदेशातील तरुणाई दिसते. काही तज्ज्ञांच्या मते कुलाबा बाजार सिंधी समाजाने सुरू केला आहे. त्यांनी प्रथम येऊन बाजारपेठ सुरू केली आणि कालांतराने हा बाजार वाढत गेला. मात्र सध्या या बाजारात मुस्लीम, सिंधी असा विविध समाज एकत्रितपणे व्यवसाय करीत आहे. ‘रिगल’ चित्रपटगृहापासून सुरू होणारा कुलाबा बाजार साधारण एक किलोमीटपर्यंत पसरला आहे. या रस्त्यांवर एके काळी व्हिक्टोरियन टांगाही चालवला जात होता.

कपडय़ांबरोबरच परदेशी प्रेक्षकांना समोर ठेवून हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तूंचीही दुकाने नव्याने उभी राहिली आहेत. यामध्ये हाताने तयार केलेले नक्षीकाम, सजावटीच्या वस्तू, पर्यावरणस्नेही वस्तू यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. परदेशातील नागरिकांना यंत्रापासून तयार केलेल्या वस्तू त्यांच्या देशात उपलब्ध होतात. मात्र हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तूंचे त्यांना आकर्षण असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत कुलाबा बाजारात हस्तकलेच्या दुकानांची संख्या वाढलेली असते. परदेशातील पर्यटनाला मध्यस्थानी ठेवून गेल्या ७० वर्षांत कुलाबा बाजारात अनेक बदल झाले आहे. परदेशी पर्यटकांच्या आवडीनुसार जुनी दुकाने बंद होऊन नवी दुकाने वसू लागली आहेत. कुलाबा बाजारात बदलाचे वारे वाहत असताना बेकायदेशीर व्यापार वाढीस लागणे हे दुर्देवी आहे.

मीनल गांगुर्डे meenal.gangurde8@gmail.com