अंबरनाथ शहराच्या पश्चिम विभागातील घाडगेनगरमधील एका सार्वजनिक शौचालयाच्या टाकीचा मंगळवारी रात्री स्फोट होऊन त्यात दोन कामगार जखमी झाले आहेत. शासनाच्या निर्मल शौचालय योजनेतून मे. स्पार्क या संस्थेने अडीच वर्षांपूर्वी २४ सीटचे हे शौचालय बांधले. बालाजी मित्र मंडळ या शौचालयाच्या देखभाल दुरूस्तीचे काम पाहत आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गॅस वाढल्याने अचानक स्फोट होऊन टाकीचे झाकण उडाले. त्यात कामगार लालचंद शेख (२१) आणि अस्मल शेख (१९) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader