लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वैद्यकीय पदव्युत्तर पदवी महाविद्यालयातील जागा वाढविणे आणि नवीन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने केले असून त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन आयोगाने वैद्यकीय शिक्षण संस्थांना अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता संस्था व महाविद्यालयांना अर्ज करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
17 bogus doctors found in a year annual review meeting of the District Health Department concluded thane news
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आव्हान; वर्षभरात १७ बोगस डॉक्टर आढळले, जिल्हा आरोग्य विभागाची वार्षिक आढावा बैठक संपन्न
principal posts , Reservation , MPSC,
अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यावर एमपीएससीने आरक्षण काढून टाकले, आता सर्व पदे खुल्या वर्गासाठी
nta decides to postponed ugc net exam date due to festivals
‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी आणि पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत अर्ज करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांना १८ सप्टेंबर रोजी परिपत्रकाद्वारे आवाहन केले होते. यावेळी अर्ज करण्यासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मंडळाने मुदत दिली होती. मात्र मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेता वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने अर्ज करण्यास ८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता.

आणखी वाचा-जगातील १२ टक्के भूभाग ऑक्टोबरमध्ये तापला; जाणून घ्या भारत, पाकिस्तानसह जगभरातील ऑक्टोबरमधील तापमान

मात्र वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांकडून मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने अर्ज सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने १० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. मंडळाने जाहीर केलेल्या पहिल्या परिपत्रानुसार अर्ज करण्यासंदर्भातील अटी व शर्ती कायम असणार आहेत, असे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Story img Loader