गोरेगावपर्यंत असलेल्या हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. विस्तार प्रकल्पामध्ये हार्बरवरील मालाड स्थानक उन्नत होणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड, कॉटन ग्रीन या स्थानकांपाठोपाठ पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकही भविष्यात उन्नत होईल.
हार्बर मार्गावर सीएसएमटी – पनवेल, सीएसएमटी – अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी – अंधेरीदरम्यान हार्बर सेवा सुरू होती. सीएसएमटी येथून अनेक प्रवासी अंधेरीपर्यंत प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढचा प्रवास करीत होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ उजाडले. परंतु तांत्रिक कारणास्तव प्रत्यक्षात गोरेगावपर्यंत लोकल गाड्या मार्च २०१९ पासून धावू लागल्या. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प एमयूटीपी-३ ए अंतर्गत राबविण्यात येत आहे.
मुंबई : हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार ; मालाड स्थानक उन्नत होणार
राज्य सरकारकडूनही निधी प्राप्त होताच या मार्गिकेच्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
मुंबई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-09-2022 at 13:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of harbor line to borivali malad station will be upgraded mumbai print news tmb 01