मुंबई : गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त झालेल्या दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी म्हाडाकडून विशेष अभियान राबविले जात आहे. याविशेष अभियानाला आता पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्या आली आहे. दरम्यान १ लाख ५० हजार ४८४ गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसापैकी आतापर्यंत एक लाख ४ हजार ९६० जणांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यातील ८१ हजार ८२५ कामगार पात्र झाले आहेत. ज्या कामगार, वारसांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत त्यांना आता १५ फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे जमा करता येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडाकडे गिरण्यांच्या जमिनीवरील गृहयोजनेचा लाभ घेण्यासाठी सादर झालेल्या दीड लाख अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. कामगार विभागाकडून पात्रता निश्चिती केली जात आहे. यासाठी म्हाडाने १४ सप्टेंबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत कामागरांकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आतापर्यंत एक लाख ४ हजार ९६० गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ८१ हजार ८२५ कामगार पात्र झाले आहेत.

हेही वाचा – धारावीकरांना ३५० चौरस फुटांचे घर

हेही वाचा – Video : विमानाला १२ तास उशीर, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी जमिनीवर बसून केलं जेवण

म्हाडाकडून कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत तर कामगार विभागाकडून पात्रता निश्चिती केली जात आहे. ही विशेष मोहीम १४ सप्टेंबर ते १४ डिसेंबर अशी सुरु राहाणार होती. मात्र या कालावधीत मोठ्या संख्येने कामगारांना कागदपत्रे जमा करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे म्हाडाने या विशेष मोहिमेला १४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपुष्टात येत असताना ४० हजारांहून अधिक कामगार, वारस कागदपत्रे जमा करू शकलेले नाही. त्यामुळे आता पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत या मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of special campaign for determination of eligibility of mill workers till february 15 mumbai print news ssb
Show comments