फेसबुक, ऑर्कुट आणि ट्विटर यांवर आमच्या नावाने कोणतेही अकाऊंट नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अमित आणि उर्वशी या दोन्ही मुलांनी जाहीर केले आहे. या दोघांनी शुक्रवारी मुंबई सायबरसेलमध्ये याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपासून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेसबूकवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच दरम्यान राज ठाकरे यांची मुलगी उर्वशी आणि मुलगा अमित यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट चालविण्यात येत होते.  खुद्द राज ठाकरे यांच्या मुलांची अकाऊंट असल्याने त्याला जोरदार प्रतिसाद मिळत होता.

Story img Loader