मुंबई : जपानमधील कंपन्या, आर्थिक गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आकर्षित करण्यासाठी राज्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असून जपानी कंपन्या आणि उद्योजकांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जपानमधील वाकायामा येथे उच्चपदस्थांबरोबर झालेल्या बैठकीत दिली. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केली असून या विद्यापीठाकडून अशी पदवी मिळणारे फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 फडणवीस यांची मंगळवारी वाकायामाचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांच्यासमवेत बैठक झाली. त्या वेळी कोयाचो येथील मेयर योशिया हिरानो, कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा र्युषो, वाकायामाचे परराष्ट्र व्यवहार संचालक योशितो यामाशिता आदी उपस्थित होते. जपानमधील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी विशेष कक्ष स्थापन करून गुंतवणूकवाढीला चालना देण्यात येईल. गव्हर्नर किशिमोटो म्हणाले की, महाराष्ट्रातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर काम करण्याची आमची इच्छा आहे. जपानमधील उद्योजक व व्यावसायिकांचे शिष्टमंडळ घेऊन मी महाराष्ट्रात येईन. फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली. तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न आदी उल्लेखनीय कार्याबद्दल ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. कोयाचो येथील महापौर योशिया हिरानो हे आगामी मुंबई दौऱ्यात फडणवीस यांना ही पदवी प्रदान करतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis awarded an honorary doctorate from a university in japan ysh
Show comments