मुंबई: फेअर प्ले या बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आतापर्यंत एकूण ३३५ कोटी ७८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. याप्रकरणी नुकतीच आलिशान मोटरगाडी, म्युच्युअल फंड व डिमॅट खाते अशा साडेचार कोटींच्या मालमत्तेवर टाच आणल्याचे ईडीने सांगितले.

महाराष्ट्र सायबर विभागाने स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी फेअर प्ले ॲपसह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार वायकॉम १८ नेटवर्क कंपनीकडे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. पण फेअर प्ले नावाच्या ॲपवर बेकायदेशीररित्या सामन्यांचे प्रसारण केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी ईडी तपास करीत आहे.

हेही वाचा – निर्मलनगर पुनर्विकासातच कायमस्वरुपी घरे द्या संक्रमण शिबिरार्थी ठाम, किती वर्षे संक्रमण शिबिरार्थी म्हणून राहायचे, रहिवाशांचा सवाल

u

वायकॉम १८ कंपनीकडे आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत. पण फेअर प्ले या ॲपवर सामन्यांचे बेकायदा प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सुमारे ४० चित्रपट कलाकारांनी या ॲपची जाहिरात केली. त्यामुळे डिजिटल स्वामित्त्व हक्कचा भंग झाल्याची तक्रार वायकॉम १८ ने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तक्रारदार कंपनीचे १०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. स्वामित्त्व हक्क भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने फेअर प्ले ॲपविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणाच्या आधारावर ईडीनेही तपासाला सुरुवात केली होती.

हेही वाचा – डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर

याप्रकरणी ईडीच्या तपासात क्रीश लालचंद शाह या व्यक्तीने फेअरप्लेसह इतर कंपन्यांची स्थापना केल्याचे उघड झाले. फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील विदेशी संस्थांमार्फत प्रसिद्ध व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय संस्थांशी करार केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. तसेच भारतीय संस्थांनी, कंपन्यांनी फेअरप्लेच्या जाहिरातीसाठी करार अंमलात आणण्यापूर्वी त्याबाबत कोणतीही योग्य काळजी घेतली नाही.

Story img Loader