मुंबई येथील दहशतवादी पथकातील आयपीएस अधिकारी असल्याचा दावा करून लोकांकडून पैसे उकळणाऱ्या तोतयांस कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.
 इंद्रजीतसिंग राठोड असे या तोतयाचे नाव असून तो पोलीस खाक्या दाखवून लोकांना धमकावीत होता. दुकानदारांकडून उधारीवर वस्तू खरेदी करीत होता. याबाबत एकाने त्याच्याविरूद्ध ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.  अधिक तपास करताना इंद्रजीतसिंह  कापुरबावडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. इंद्रजीत बोगस आयपीएस अधिकारी असल्याचे तपासात निष्पन्न होताच त्याला अटक केली. ठाणे येथील कोलशेत भागात इंद्रजीतसिंग राहतो. तो आयपीएस अधिकारी असल्याचे भासत होता. त्याच्या इमारतीत राहणारे धर्मेद्र सिंग यांना कार घ्यायची होती. त्या संधीचा फायदा इंद्रजीतने घेतला. कर्जाची परतफेड न केल्यास बँक वाहन जप्त करते आणि त्याची स्वस्तात विक्री करते. बँकेतील एका अधिकाऱ्याची ओळख असून त्याच्यामार्फत अशी कार मिळवून देतो, असे त्याने धर्मेंद्र यांना सांगितले होते. त्याने तीन लाख ६० हजारात स्कॉर्पिओ जीप मिळत असल्याचे सांगत धर्मेद्र यांच्याकडून बँकेतील एका अधिकाऱ्याच्या नावाने सुमारे एक लाख ८३ हजारांचा डिमांड ड्राफ्ट घेतला होता. तसेच ४२ हजार रुपयांची रोकडही घेतली होती. मात्र, साडेचार महिने उलटूनही कार मिळत नाही. त्यामुळे धमेंद्र यांनी पोलिसांत तक्रार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा