मुंबई पोलिसांनी सध्या एका व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे. आता पत्र व्हायरल होणं ही बाब नवीन नाही. मात्र या प्रकरणात महिला पोलिसांनी थेट पोलीस खात्यातल्या दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे हे आरोप पोलीस खात्यात काम करणाऱ्या महिला पोलिसांकडूनच झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस सह आयुक्त यांच्याकडे डिसेंबर महिन्यात देण्यात आलं आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पत्रात नेमका काय आरोप करण्यात आला आहे?

जे पत्र व्हायरल होतं आहे त्या पत्रात हा आरोप महिला पोलिसांनी केला आहे की तीन अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी नेलं तिथे त्यांचं लैंगिक शोषण केलं. तसंच आम्ही खेड्यांमधून आलो असल्याने आमचा फायदा घेतला गेला. आम्हाला कामाच्या वेळांमध्ये कुठलीही मोठी जबाबदारी न देण्याच्या बदल्यात दोन पोलीस आम्हाला उपायुक्तांच्या घरी घेऊन गेले आणि तिथे आमच्यावर बलात्कार झाला तसंच लैंगिक शोषणही करण्यात आलं असा उल्लेख या पत्रात आहे. या पत्राची प्रत सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. मोटर परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलिसांची नावं आणि सह्या या पत्रावर आहेत. पत्रात नमूद केल्याप्रमाणे या आठही महिलांनी पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

आणखी काय म्हटलं आहे पत्रात?

या पत्रात असंही नमूद करण्यात आलं आहे की पती आणि इतर कुटुंबीय गावी आहेत. आम्ही महिला मुंबईत एकट्याच राहतो. पोलीस दलाविषयी आम्हाला नीटशी माहिती अजून झालेली नाही. याचाच गैरफायदा घेतला जातो आहे आणि आमचं लैंगिक शोषण आणि बलात्कार केला जातो आहे. आमच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आम्ही उपायुक्तांची भेट घेतली. मात्र त्यांनी आम्हाला केबीनमधून हाकलून दिलं असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. उपायुक्तांचे ऑपरेटर, ऑर्डर्ली तसंच चालकांनीही आम्हाला धमकावून अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आमच्यावर बलात्कार केला असाही धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

मुंबई पोलीस खात्याचे सह पोलीस आयुक्त एस जयकुमार यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संपर्क केला असता, “आम्ही या प्रकरणाची चौकशी करतो आहोत. बलात्काराचे आरोप ज्या महिलांनी केले आणि ज्यांची नावं या पत्रात आहेत त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली असता आम्ही असं पत्र लिहिलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता हे पत्र नेमकं कुणी पाठवलं याचा शोध आम्ही घेत आहोत.” असं जयकुमार यांनी म्हटलं आहे.

ज्यांची नावं पत्रात आहेत त्या महिलांचं म्हणणं काय?

इंडियन एक्स्प्रेसने जेव्हा महिला चालकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी असं काही पत्र लिहिलं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच या पत्रात ज्या महिला पोलिसांची नावं आहेत त्यातल्या एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “जेव्हापासून हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे तेव्हापासून मला धक्काच बसला आहे. कारण मी काय आम्ही कुणीही असं पत्र लिहिलेलं नाही. माझ्या घरातले लोक खूपच चिडले आहेत. तसंच या पत्रानंतर आम्हाला येणारे फोन कॉल्स थांबण्याचंच नाव घेत नाहीयेत. माझ्या आई वडिलांना वाटतंय की हे सगळं खरं आहे.” असं एका महिला कॉन्स्टेबलने सांगितलं.

याच प्रकरणातल्या दुसऱ्या एका महिलेने सांगितलं, “या पत्रात ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं लिहिण्यात आली आहेत त्यांना मी पाहिलेलंही नाही. माझ्यासाठी हा खूपच मोठा मानसिक धक्का आहे. तुमचा या पत्राविषयी कुणावर संशय आहे असं मला पोलीस खात्यातले लोक विचारत आहेत. मी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे.” असं आणखी एका महिलेने सांगितलं आहे.