बिअरच्या दुकानाच्या परवान्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दीड वर्षांपूर्वी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर अंधेरी पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.
हेही वाचा >>>मुंबई: राज्यातील कारागृहांची संख्या वाढणार; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती
निवेदन सुनिल कोटेकर(२४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत दोन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. तक्रारदार महेश कुंभार अंधेरी परिसरातील रहिवासी असून त्यांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. याप्रकरणातील दोन आरोपी त्यांच्या परिचयाचे होते. दोघेही परिसरात सुविधा केंद्र चालवत होते. ते दोघेही मालमत्तांच्या दलालीसह पॅनकार्ड, पारपत्र, पैशांचे हस्तांतरण करणे, वाहन चालक परवाना, गुमास्ता परवाना, वीज देयके भरणे आदी कामे करतात. सप्टेंबर २०१९ महेश कुंभार हे त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी या दोघांनी त्यांना वेल्डींग व्यवसायात पूर्वीसारखा पैसा नसून तुम्ही बिअरचे दुकाने उघडा, तुम्हाला परवाना मिळवून देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून रोख आणि धनादेश स्वरुपात चार लाख साठ हजार रुपये घेतले होते. यावेळी त्यांच्या कार्यालयात अटक आरोपी निवेदन कोटेकर हादेखील होता. बिअर दुकानाचा परवाना निवेदन हाच मिळवून देईल असे त्यांना सांगण्यात आले होते. काही महिन्यानंतर निवेदनने त्यांना दूरध्वनी करुन त्यांचे बिअर दुकानाच्या परवान्याचे काम झाल्याचे सांगितले. महेश आणि प्रकाश यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना एक पाकिट दाखविण्यात आले होते.
हेही वाचा >>>मुंबई: दिघा स्थानक वर्ष अखेरीस पूर्ण होणार
त्यात हिरव्या रंगाच्या शाईने मराठी प्रति मेसर्स एम. के बिअर शॉप ऍण्ड वाईन, महेश कुंभार, कुंभार चाळ, गुंदवळी हिल, आझाद रोड, अंधेरी पूर्व असे लिहिले होते. पत्रावर एक आरएनए क्रमांक होता आणि खाली राज्य उत्पादन शुल्क, मादम कामा रोड, मंत्रालय असा पत्ता होता. असे २२ फेब्रुवारी २०२१ ही तारीख होती. उजव्या कोपर्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी होती. ते पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते. लवकरच त्यांना बिअर दुकानाचा अधिकृत परवाना मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी परवाना दिला नाही. त्यानंतर निवेदनने त्यांना दूरध्वनी करुन त्यांचे काम होणार नाही. तुमचे पैसे परत करतो असे सांगितले, मात्र त्यांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या तिघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच २६ मे २०२१ रोजी महेश कुंभार यांनी निवेदन कोटेकरसह दोघांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर दीड वर्षांनंतर याप्रकरणी निवेदन कोटेकर याला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांतील इतर दोघेजण अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.