Cyber scam: सायबर घोटाळ्याबाबत रोज नवनवीन बातम्या समोर येत असतानाही त्याच प्रकारच्या सायबर फसवणुकीला लोक आताही बळी पडत आहेत. शेअर ट्रेडिंग, मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झाला आहे किंवा तुमच्या घरातील मुलगा किंवा मुलगी एका प्रकरणात अडकले असल्याची बतावणी करून सायबर चोरटे अनेकांना गंडा घालत आहेत. विशेष करून उच्चशिक्षित लोकही अशा फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसते. मुंबईतील महिला वकिलाची अशाच प्रकारे फसवणूक झाली असून चोरट्यांनी पैशांसह या महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडीओही मिळवले आहेत.

प्रकरण काय आहे?

मुंबईतील ३६ वर्षीय वकिल महिलेला बुधवारी दुपारी एक कॉल आला. ज्यामध्ये तिच्याविरोधात एफआयआर दाखल झाला असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याशी संबंधित एका प्रकरणात या महिला वकिलाचेही नाव गुंतले असल्याचे तिला सांगण्यात आले. नरेश गोयल यांना ईडीने आर्थिक घोटाळ्यात अटक केली होती, मात्र ते आता जामीनावर बाहेर आहेत.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक

हे वाचा >> मुंबईतील सर्वात मोठा सायबर स्कॅम; महिलेची २५ कोटींची फसवणूक, चोरांची ट्रीक अशी होती

गोपनीय चौकशी करायची असल्यामुळे आणि पोलीस स्थानकात येण्यापेक्षा त्रयस्थ ठिकाणी चौकशी करू, असे सांगून या महिलेला पवई येथील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले गेले. तिथे गेल्यावर एका महिला अधिकाऱ्याकडून पीडित महिलेच्या शरीरावरील जखमा आणि काही शस्त्र बाळगले आहे का? याची खातरजमा करण्यासाठी पीडितेला विवस्त्र होण्यास सांगितले गेले. तसेच तिच्या खात्यातून ५० हजार रुपये चोरट्यांनी आपल्या खात्यात वळविण्यास सांगितले.

हा प्रकार सुरू असताना महिलेला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला. त्यानंतर तिने थेट पवई पोलीस ठाणे गाठले. सायबर चोरट्यांच्या कॉल आणि मेसेजला उत्तर न दिल्यामुळे अखेर चोरट्यांनी तिचे नग्न फोटो तिलाच पाठवून आणखी पैशांची मागणी करायला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिलेला पहिला फोन आला तेव्हा, समोरच्या व्यक्तीने तो TRAI मधून बोलत असल्याचे सांगितले होते. पीडितेचे सीम कार्ड मनी लाँडरिंग प्रकरणात वापरले गेले असून ते लवकरच ब्लॉक केले जाणार असल्याची भीती दाखविली.

हे ही वाचा >> सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?

महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, पहिला फोन आल्यानंतर मला पवई सायबर सेलमधून दुसरा फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानेच मला अटक टाळण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मी घाबरले, अटक होण्याची भीतीने हॉटेलमधील रुम बुक करून तिथे गेले, असे पीडितेने सांगितले. हा फसवणुकीचा प्रकार होत असताना महिलेला याबद्दल कुणालाही माहिती न देण्याची भीती दाखवले.

पवई पोलीस ठाण्यातील अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पीडित महिलेने ज्या बँक खात्यात पैसे वळते केले, त्याची माहिती मिळविली जात आहे.