बनावट पर्यटन कंपनी सुरू करून ४१७ पर्यटकांना ठकवणाऱ्या एका बनावट प्रवासी एजंटला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली. करण व्यास उर्फ राहुल सक्सेना (२४) असे या तरुणाचे नाव असून, त्याने १ कोटी ८६ लाख रुपयाची माया अनेक लोकांना फसवून जमा केल्याचे समोर आले आहे.
अंधेरीच्या लोखंडवाला भागातील एका मॉलमध्ये ‘मूव्ह हॉलिडेज’ या नावाने आपली पर्यटन कंपनी सुरू करणाऱ्या राहुलने गोवा, बँकॉक, केरळ, थायलंड आदी ठिकाणी सहल घेऊन जात असल्याचे भासवले. हे दुकान सुरू करताना त्याने राकेश शर्मा नावाच्या एका व्यक्तीच्या ओळखीने दुकान भाडय़ाने घेतले. अत्यंत आकर्षक पॅकेज देत त्याने अल्पावधीतच अनेक ग्राहकांना आपल्याकडे वळवले. तब्बल ४१७ पर्यटकांना आपल्या सहलीची पॅकेजेस विकली. त्यातून त्याने १ कोटी ८६ लाख १८ हजार रुपये जमवले. हे पैसे घेऊन त्याने पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पर्यटकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर विशेष पथकाची स्थापना करून त्याचा शोध घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा