लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेलने वित्तपुरवठादाराने विनयभंग केल्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी वित्तपुरवठादाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
national women commission form fact finding committee in murder of a girl Inside bpo premises
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल

तक्रारदार अभिनेत्रीच्या जुहू येथील घरी हा प्रकार घडला. तक्रारीनुसार अभिनेती तिच्या राहत्या घरी असताना गुरूवारी आरोपी सुनील पारसमणी लोढा तिच्या घरी गेला. त्याने चित्रफीत चित्रीकरणारासाठी अभिनेत्रीला काही रक्कम दिली. त्यानंतर त्याने अभिनेत्रीला स्पर्श करण्यास सुरूवात केली. अभिनेत्रीने विरोध केला असता त्याने रागाच्या भरात तिला शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर अभिनेत्रीने जुहू पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीनुसार जुहू पोलिसांनी भादंविअंतर्गत विनयभंग, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader