मुंबई : सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा विशाल सोहळा असणारा ‘महाकुंभ मेळा’ सुरू आहे. देशातील विविध भागांतून बहुसंख्येने साधू – संत, सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकीय, मनोरंजन आदी विविध क्षेत्रातील मंडळी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यानेही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. ‘महाकुंभ २०२५’ हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव असल्याचे स्वप्नील जोशी याने समाज माध्यमावर पोस्ट करीत म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला महाकुंभमेळा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सुरू आहे. महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी स्नान केले. तर दिवसेंदिवस प्रयागराजमध्ये गर्दी वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्रिवेणी संगमात स्नान केले. तसेच विविध क्षेत्रातील नामांकित मंडळीही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठमोळा स्वप्नील जोशी यानेही महाकुंभमेळ्यात पोहोचून त्रिवेणी संगमात स्नान केले. यासंदर्भात समाजमाध्यमावर एक चित्रफीत टाकून व एक पोस्ट लिहीत स्वप्नील जोशी याने आपला अनुभव कथन केला.

स्वप्नील जोशी याने समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘महाकुंभ २०२५ हा आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव आहे. प्रयागराजमध्ये ‘महाकुंभ २०२५’ला उपस्थित राहण्याचा आणि महासंगमात स्नान करण्याचा योग आला. हा दिव्य प्रवास अनुभवण्याचे भाग्य लाभले, यासाठी माझ्या भावाला सौरभ गाडगीळ आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद. या अद्भुत महाकुंभाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळणे, हा आशीर्वाद वाटतो.