लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचे बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेले काही महिने वृध्दापकाळामुळे ओढवलेल्या आजाराशी त्या झुंजत होत्या. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चिरंजीव शारंग देव पंडित आणि कन्या अभिनेत्री दुर्गा जसराज आणि त्यांचा परिवार आहे.
आणखी वाचा-राष्ट्रपुरुष, समाजसुधारकांच्या पंक्तीत मेटे, आनंद दिघेंना स्थान
मधुरा जसराज या विख्यात चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या कन्या होत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक पंडित जसराज यांच्याशी १९६२ साली त्या विवाहबद्ध झाल्या. मधुरा जसराज या स्वतः उत्तम लेखिका होत्या, चित्रपट दिग्दर्शन कलाही त्यांना अवगत होती. वयाच्या ७३ व्या वर्षी २०१० मध्ये ‘आई तुझा आशिर्वाद’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे सगळ्यात उशिरा चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वयस्कर दिग्दर्शिका असा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या नावावर नोंदला गेला. त्यांनी आपले वडील व्ही. शांताराम यांच्यावरील ‘पोर्ट्रेट ऑफ ए पायोनियर : व्ही शांताराम’ या माहितीपटाचे दिग्दर्शन केले होते. तर ‘शांतारामा’ या वडिलांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन आणि संपादनही मधुरा जसराज यांनी केले होते.