राष्ट्रीय उद्यानातील सिंह वयोवृद्ध झाल्यामुळे हालचालींवर मर्यादा

नमिता धुरी

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न

मुंबई : भायखळय़ाच्या  वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात सिंह आणण्याची प्रक्रिया विविध कारणांमुळे अडकली असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंहही वयोवृद्ध झाले आहेत. या सिंहांच्या हालचालींवरही मर्यादा येऊ लागल्याने नजीकच्या काळात मुंबईकरांना वनराजाचे दर्शन मिळणे कठीण बनणार आहे.

 सध्या राष्ट्रीय उद्यानात ११ वर्षांचा ‘जस्पा’व १८ वर्षांचा ‘रवींद्र’ असे दोन सिंह आहेत. सिंहांचे नैसर्गिक अधिवासातील आयुष्य १५ वर्षे व मानवनिर्मित अधिवासातील आयुष्य १८ ते २२ वर्षे असते. ‘रवींद्र’ने नैसर्गिक आयुर्मान पूर्ण केले आहे. तसेच मानवनिर्मित अधिवासातील आयुर्मानाची किमान मर्यादाही ओलांडली आहे. त्यामुळे सफारीमध्ये फिरण्याची ताकद त्याच्यात राहिलेली नाही. ‘जस्पा’कडे नैसर्गिक आयुर्मानातील ३-४ वर्षेच उरली आहेत. या सिंहांच्या वाढत्या वयोमानाचा अंदाज घेऊन राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने तेलंगणा, कर्नाटक, गुजरात येथील प्राणिसंग्रहालयांकडे सिंहाच्या दोन जोडय़ांची मागणी केली होती; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच उद्यानातील सिंह सफारीचे विस्तारीकरण रखडल्याने प्रशासनाने त्याबाबत पावले उचलली नाहीत. परिणामी नव्या दमाचे सिंह राष्ट्रीय उद्यानात दाखल होण्याची शक्यता धूसर बनली आहे. याबाबत राष्ट्रीय उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयानेही काही महिन्यांपूर्वी साखरबाग व इंदौर येथील प्राणिसंग्रहालयांकडे सिंहांची मागणी केली आहे. या प्राणिसंग्रहालयांच्या मागणीनुसार इस्रायलमधून झेब्य्राची जोडी आणून इंदोर संग्रहालयाला देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून  सिंह राणीच्या बागेकडे सुपूर्द करण्यात येतील, असे राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

एके काळी ५० सिंह

साधारण २५ वर्षांपूर्वी राष्ट्रीय उद्यानात ५० सिंह होते. ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’च्या सूचनेनुसार बरेचसे सिंह देशातील विविध प्राणिसंग्रहालयांना देण्यात आले. जे सिंह राष्ट्रीय उद्यानात राहिले त्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्यामुळे सिंहांची संख्या वाढली नाही. याउलट वयोमानानुसार काही सिंह मृत पावले व सिंहाची संख्या कमी होत गेली.