तिकीट १ ते ३ रुपयांनी तर पास १० ते ३० रुपयांनी वाढण्याची शक्यता
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या विविध कामानिमित्त उपनगरी प्रवासावर अधिभार लावण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असून १ जानेवारी २०१३ पासून उपनगरी प्रवासाचे भाडे वाढणार आहे. तिकीटावर एक ते तीन रुपये तर मासिक पासावर १० ते ३० रुपये अधिभार लागण्याची शक्यता असून याबाबतची अधिकृत घोषणा शुक्रवारी होणार आहे.
मुंबईच्या रेल्वे विकासाची कामे करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुंबई रेल्वे विकास महामंडळाला निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपनगरी प्रवासाच्या भाडय़ावर अधिभार लावण्याची सूचना राज्य शासनाने रेल्वे बोर्डाला केली होती. रेल्वे बोर्डाने दर तीन वर्षांंनी असा अधिभार लावण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, २००३ मध्ये तिकिटावर एक रुपया तर मासिक पासावर १० रुपये अधिभार लावला होता. २००६ आणि २००९ मध्ये असा अधिभार लावण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला होता. हा अधिभार लागला असता तर २००६ मध्ये तिकीट दोन रुपये आणि पास २० रुपये आणि २००९ मध्ये तिकीट तीन रुपये आणि पास ३० रुपयांनी वाढला असता. हा अधिभार वाढविण्यात आला तर रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध झाला असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला निधीसंदर्भात पत्र पाठविले असून रेल्वे बोर्डाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा अधिभार वाढविम्यास मंजुरी दिल्याचे गुरुवारी सायंकाळी उशीरा जाहीर केले. फ जानेवारीपासून हा अधिभार लागू करण्यात येणार असला तरी हा अधिभार नेमका किती असेल याबाबत शुक्रवारी स्पष्ट करण्यात येईल, असे सूत्रांनी
सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा