लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ किमीच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे २०२५ मध्ये सुटका होणार आहे. वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला असून आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर आता उर्वरित काम पूर्ण होण्यास मे २०२५ उजाडणार आहे.

Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Water Logging due to heavy rainfall at Bhandup railway station.
Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
Chemical tanker accident on mumbai ahmedabad highway
पालघर : महामार्गावर रसायनाचा टँकर उलटला; रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड
Untimely movement of heavy vehicles continues Congestion on Mumbai Nashik Highway Mumbra Bypass
अवजड वाहनांची अवेळी वाहतुक सुरूच; मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच
Ten accused who blocked vehicles on the highway and committed robberies arrested in Chhattisgarh
वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा एकूण १४२ किमीचा महामार्ग आहे. या रस्त्याच्या ११८.२० किमीच्या आठपदरीकरण आणि काँक्रीटकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) केले जात आहे. तर वडपे ते ठाणे अशा २३.८०० किमीच्या महामार्गाचे काम एमएसआरडीसीकडून सुरु आहे. एमएसआरडीसीकडून मे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पर्सच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ मध्ये ११८२ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा-कृत्रिम प्रज्ञेद्वारे पाच महिन्यात १०१ शस्त्रक्रिया; केईएम रुग्णालयात उपक्रम

करारानुसार हे काम सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला आहे. कामामुळे मागील दोन वर्षांपासून प्रवाशी,वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अशात आता पावसाळ्यात हा महामार्ग खड्ड्यात गेला आहे. संपूर्ण महामार्गावर खड्डे असल्याने वाहतूक कोंडीत आणखी वाढ होत असून प्रवाशांना, वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे.वडपे ते ठाणे दरम्यानच्या २५ ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी एक-दीड तास वा कधीकधी याहीपेक्षा अधिक वेळ वाया घालवावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आता या कामास काही कारणाने विलंब झाल्याने आता कामाच्या पुर्णत्वास जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा आता मे २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाच्या दौर्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान हा महामार्ग आठ पदरी झाल्यास वडपे ते ठाणे अंतर केवळ २५ मिनिटांत पार होईल असा दावा यानिमित्ताने एमएसआरडीसीने केला आहे. त्याचवेळी सध्या २३ किमी दरम्यानचे खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा-कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांना दिलासा, विजेत्या कामगारांचे सेवाशुल्क माफ

  • जून २०२१ मध्ये कामास सुरुवात
  • ११ सप्टेंबर २०२४ जून २०२५
  • सेवा रस्ता ३५.३९ किमी

काँक्रीटीकरण आणि मुख्य रस्त्याच्या कामाचा तपशील

  • मुंबई-नाशिक वाहिनीच्या दोन पदरी सेवा रस्त्याच्या १७.५० किमीच्या काँक्रीटीकरणापैकी १५ किमीचे काँक्रीटीकरण पूर्ण.
  • उर्वरित २.५० किमीचे काँक्रीटीकरण जानेवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण.
  • नाशिक-मुंबई वाहिनीवरील दोन पदरी सेवा रस्त्याच्या १७.५० किमीच्या काँक्रीटीकरणापैकी १४.५० किमीचे काँक्रीटीकरण पूर्ण.
  • उर्वरित ३ किमीचे काँक्रीटीकरण जानेवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण.
  • मुंबई-नाशिक वाहिनीवरील चार पदरी मुख्य रस्त्याच्या १२.९१६ किमीपैकी १०.२ किमीचे काम पूर्ण.
  • उर्वरित २.७२६ किमीचे काम फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण.
  • नाशिक-मुंबई वाहिनीवरील चार पदरी मुख्य रस्त्याच्या १२.९१६ किमीपैकी ८.२ किमीचे काम पूर्ण.
  • उर्वरित ४.७१६किमीचे काम काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत होणार पूर्ण.

२३.८०० किमी आठ पदरीकरण प्रकल्पातील मोठ्या पुलाच्या कामाचा तपशील

  • ०.२०० किमीच्या कळवा खाडीपूलाचे ७२ टक्के काम पूर्ण, उर्वरित काम जानेवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण
  • ०.०८४ किमीच्या रेल्वेच्या पुलाचे ३५ टक्के काम पूर्ण, उर्वरित काम फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण
  • ०.३२० किमीच्या वडपे उड्डाणपुलाचे ३९ टक्के काम पूर्ण,उर्वरित काम एप्रिल २०२५ मध्ये होणार पूर्ण
  • ०.८२० किमीच्या कशेळी खाडीपुलाचे ६३ टक्के काम पूर्ण, उर्वरित काम मे २०२५ मध्ये होणार पूर्ण

आणखी वाचा- कमाठीपुरा पुनर्विकासाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

भुयारी मार्गाच्या कामाचा तपशील

  • ०.७८ किमीच्या वालशिंद भुयारी मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण, सप्टेंबर २०२४ मध्ये उर्वरित काम पूर्ण होणार
  • ०.९८ किमीच्या सोनाळे भुयारी मार्गाचे ५० टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२४ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०५६ किमीच्या सरवली भुयारी मार्गाचे ५० टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२४ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०.९० किमीच्या ओवळी भुयारी मार्गाचे ५५ टक्के काम पूर्ण, जानेवारी २०२५ मध्ये उर्वरित काम पूर्ण होणार
  • ०.७८ किमीच्या दिवे गाव भुयारी मार्गाचे ५० टक्के आणि दिवे भुयारी मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण, जानेवारी २०२५ मध्ये उर्वरित काम पूर्ण होणार
  • ०.७१ किमीच्या येवई भुयारी मार्गाचे ४० टक्के काम काम पूर्ण, मार्च २०२५ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०.८८ किमीच्या पिंपळास भुयारी मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण, मार्च २०२५ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०.५८ किमीच्या मानकोली भुयारी मार्गाचे २० टक्के काम पूर्ण, मे २०२५ मध्ये उर्वरित काम होणार पू्र्ण
  • ०.५७ किमीच्या खारेगाव भुयारी मार्गाचे ० टक्के काम पूर्ण, काम मे २०२५ मध्ये होणार पूर्ण