गोरेगाव येथे राहणार्‍या एका २२ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार  उघडकीस आल. याप्रकरणी विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी पित्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी पिता सध्या पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिडीत तरुणी ही तिच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहते. ती एका खाजगी कंपनीत कामाला असून तिचे पिता काहीच कामधंदा करीत नाही. ते तिच्याशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग करीत होते. तसेच त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. २३ ऑक्टोंबरला या तरुणीने तिच्या पित्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी पित्याविरुद्ध पोलिसंनी ३५४, ३७६ (२), (एफ), ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.  न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. आरोपी पित्याविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father arrested for molesting 22 year old girl in goregaon zws