आपल्या १७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वडिलांना विठ्ठलभाई पटेल रोड पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. ही मुलगी आई, वडिल आणि भावासह गिरगाव येथे एका चाळीत राहते. गेल्या वर्षभरापासून वडिलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू होते. या मुलीने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी मुलींच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

Story img Loader