ठाकुर्लीजवळील कांचनगावमध्ये एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा दोन तरुणांनी शुक्रवारी रात्री विनयभंग केला.  या तरुणांना तिच्या वडिलांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बेदम मारहाण केली.  या तरूणांना टिळकनगर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली असून  गणेश भरत चौधरी (वय २२, रा. कांचनगाव, मच्छिविक्रेता), प्रतिक कोळंबे (वय १७, शिक्षण बारावी) अशी त्यांची नावे आहेत.
ही शाळकरी मुलगी डोंबिवलीत आठवीत शिकते. गेले दोन महिने दोन तरुण आपला पाठलाग करीत असल्याची बाब तिने आईवडिलांना सांगितली होती.
 शुक्रवारी ही मुलगी डोंबिवलीतील गाण्याची शिकवणी संपवून रात्री साडे आठ वाजता कांचनगावातील साईराज पार्ककडे येत होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन तरुण पाठलाग करीत आले.    त्यांनी तिच्याशी अश्लील संभाषण करून विनयभंग केला. सोसायटीच्या आवारात या मुलीचे वडील उभे होते.  त्यांनी तात्काळ मुलीच्या दिशेने धाव घेतली. या तरुणांशी त्यांची बाचाबाची झाली. या तरुणांनी मुलीच्या वडिलांना बेदम मारहाण केली. याबाबत ओरडा होताच दुचाकी घटनास्थळी टाकून त्यांनी पळ काढला. त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला.
कल्याणमध्ये विनयभंग
कल्याण पूर्वेतील कैलास कॉलनीमधील सह्य़ाद्री पार्क येथे राहणाऱ्या भरत जाधव (वय ३२) या विवाहित तरुणाने शेजारील एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग     केला आहे.  भरत हा घरासमोर उभे राहून त्या तरुणीबरोबर अश्लील हावभाव करीत होता, तसेच शिट्टी मारून तिला विचलित करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा