मुंबईः लालबाग येथे ४२ वर्षीय पित्याने मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. भूपेश आत्माराम पवार(४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते गणेश गल्ली येथील विमावाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासोबत राहत होते. मंगळवारी त्यांनी पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर मुलगी आर्या पवार (११) हिला गळफास लावून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.

राहत्या घरात हा प्रकार घडल्यानंतर त्यांना तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी सुरूवातीला दोन अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेमुळे कुटुंबिय बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मंगळवारी रात्री याप्रकरणी भाग्यश्री पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्याच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी पवार यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Maha Kumbh
Maha Kumbh Mela 2025: : महाकुंभ मेळ्यात हृदविकाराच्या झटक्याने ११ जणांचा मृत्यू? खोटी माहिती पसरवणाऱ्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Story img Loader