अभिनेत्री जिया खान मृत्यूच्या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांना अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एफबीआय(फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन) मदत करणार आहे. अमेरिकेच्या दुतावासाने सीबीआयला पाठवलेल्या पत्रामध्ये जिया खानच्या मृत्यू प्रकरणी तांत्रिक आणि न्यायालवैद्यकीय चौकशीमध्ये सहाय्य करण्यास एफबीआय तयार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली स्थित अमेरिकेच्या दुतावासातून हे पत्र सीबीआयला पाठवण्यात आले आहे. जिया मुळची अमेरिकी नागरीक असल्यामुळे तिची आई रबिया खान यांनीअमेरिकेच्या  दुतावासाकडे चौकशीमध्ये हस्तक्षेपाची मागणी केली होती. रबिया यांच्या पत्रावर विचार करून अमेरिकेच्या दुतावासाने सीबीआयला हे पत्र पाठवले असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जियाच्या मृत्यूनंतर पोलीसांकडे दिलेल्या वस्तूंवरून तिचा खून झाल्याचे दिसते, असा दावा जियाची आई रबिया खान यांनी केला आहे. या प्रकरणी रबिया खान यांनी उच्च न्यायालयात देखील दाद मागितली आहे. चौकशी पुढे जात नसल्याने आक्टोंबरमध्ये रबिया यांनी  अमेरिकेने या प्रकरणी मदत करावी अशी मागणी करणारे पत्र अमेरिकेचे भारतीमधील दुत नान्सी पॉवेल यांना लिहिले होते. अमेरिकेच्या नागरी सेवेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख रोझमेरी मॅकरी यांनी रबिया याना इ-मेल द्वारे  अमेरिकेचा निर्णय कळवला आहे. या इ-मेलमध्ये सीबीआय स्थानिक प्रशासनाला या निर्णयाची प्रत लवकरच पाठवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रकरणी भारतीय प्रशासकीय निर्णय कळे पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे त्यांनी रबिया यांना सांगितले आहे.
परंतू नवी दिल्लीमध्ये सीबीआयच्या प्रवक्त्यांनी अशा कोणत्याही पत्राबद्दल माहिती नसल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी तपासात कसूर केल्यामुळे मला अमेरिकेकडे मदतीची मागणी करण्याची वेळ आली असल्याचे रबिया यांनी सांगितले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा