मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या काळात होणाऱ्या भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून अन्नपदार्थ खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. तसेच अन्नपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांना सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूचनांच्या पालनात टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सणासुदीला तेल-तूप, मिठाई, दूध-दुग्धजन्य पदार्थ, रवा, मैदा, बेसन यांसारख्या अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्याचाचा फायदा घेत काही मंडळी अन्नपदार्थांमध्ये भेसळ करतात. असे प्रकार रोखण्यासाठी दरवर्षी सणासुदीच्या काळात  ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते.  यंदाही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अन्नपदार्थ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने काही सूचनाही केल्या आहेत. ग्राहकांपर्यंत सुरक्षित अन्नपदार्थ पोहचविण्याची जबाबदारी विक्रेते आणि उत्पादकांची आहे. त्यामुळे त्यांनाही सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

हेही वाचा >>> वांद्रे-वरळी सागरीसेतूवर २०३९ पर्यंत टोल द्यावा लागणार, न्यायालयाने याचिका फेटाळताच नव्या कंत्राटदाराची नियुक्ती

एफडीएकडून विक्रेत्यांना करण्यात आलेल्या सूचना –

– मिठाईची कालमर्यादा ठळकपणे नमूद करावी.

– दूध, खवा, खाद्यतेल आदी परवानाधारक / नोंदणीधारक वितरक/उत्पादकांकडून खरेदी करून त्याचे बिल घ्यावे.

– अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.

– अन्न पदार्थ स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

– कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करावी.

– अन्नपदार्थ तयार करताना फूड ग्रेड खाद्यरंगाचा १०० पी. पी. एम. मर्यादेपर्यंतच वापर करावा.

– मिठाईचे सेवन किती तासांत करावे याबाबतची माहिती वेष्टनावर नमूद करावी.

– अन्नपदार्थ झाकून ठेवावेत.

– विक्रेत्यांनी स्वतःचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे.

– तीन वेळा वापरलेले खाद्यतेल नियमानुसार बायोडिझेल कंपनीला देणे बंधनकारक.

हेही वाचा >>> Raj Thackeray Meets Fadnavis: राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, एक तास सुरु होती बैठक, चर्चांना उधाण

ग्राहकांना सूचना

– अन्नपदार्थ, दूध-दुग्धजन्य पदार्थ परवानाधारक/नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत.

– अन्नपदार्थ, मिठाई ताजी असल्याची खात्री करूनच खरेदी करावी.

– वेष्टनावरील तारीख तपासूनच अन्नपदार्थ खरेदी करावी.

– खरेदी बिल घ्यावे.

– उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करू नयेत.

– मिठाई २४ तासात संपवावी. बंगाली मिठाई ८-१० तासात संपवावी. – काहीही संशयीत आढळल्यास तात्काळ एफडीएशी हेल्पलाईन क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fda s special inspection campaign begins ahead of festive season mumbai print news zws
Show comments